माजी आमदार शिवाजीराव कर्डिले 
महाराष्ट्र

तुमचं आयुष्यच टक्केवारी खाण्यात गेलं, कर्डिलेंचा पलटवार

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर ः ‘‘जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कामांत टक्केवारी खाण्यातच यांचे आयुष्य गेले. स्वतः चोऱ्या करायच्या, आपले ‘कर्तृत्व’ झाकण्यासाठी काही तरी आरोप करायचे व तालुक्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल करून सहानुभूती मिळविण्याचा खटाटोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सुरू आहे.

(कै). दादा पाटील शेळके यांचे नाव बाजार समितीला दिल्याने महाविकास आघाडीच्या मंडळींना त्रास व्हायला लागला आहे,’’ अशा शब्दांत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, प्रताप शेळके यांच्यासह नगर तालुक्यातील महाविकास आघाडीवर जोरदार पलटवार केला. Former MLA Shivajirao Kardile criticizes the opposition

चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे नेत्रतपासणी शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी कर्डिले बोलत होते. ते म्हणाले, ‘‘तालुक्यातील कुठल्याही निवडणुकीत विरोधकांनी फक्त दादा पाटलांच्या नावाचा वापर करून स्वतःचे उखळ पांढरे केले. नगर तालुका बाजार समिती राज्यात आपल्या कामातून अग्रेसरच राहिली आहे. त्यामुळे बाजार समितीला त्यांचे नाव दिले आहे. ते कदापि खराब होऊ देणार नाही.

गेल्या पंधरा वर्षांत जिल्हा बॅंकेत तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून त्यांना मदतच केली. मागील पंचवीस वर्षे नगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राबत राहिलो. यापुढेही कायम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे.’’ Former MLA Shivajirao Kardile criticizes the opposition

दूध संघाचे काय झाले?

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या सीना दूध संघाला जिल्हा बॅंकेने सातत्याने मदत केली आहे. या दूध संघाचे काय झाले, हे त्यांनी जनतेला सांगावे, असे आव्हान यावेळी कर्डिले यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात आज एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद

Success Story: MBBS केलं, नंतर पहिल्याच प्रयत्नात USPC क्रॅक; IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; सौम्या झा यांचा प्रेरणादायी प्रवास

Mangal Gochar: काही तासांनंतर मंगळ करणार बुधाच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर होणार सकारात्मक प्रभाव

Tuesday Horoscope : नागदेवतेची कृपा होणार; अचानक धनयोग येणार; ५ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार फलदायी

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT