Ramesh kadam saam Tv
महाराष्ट्र

Ramesh kadam: तुरुंगात असताना छगन भुजबळ शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे; रमेश कदमांचा आरोप

Ramesh kadam: पंढरपूर येथे माध्यमांशी बोलताना रमेश कदम यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केलीय.

Bharat Jadhav

Ramesh kadam Critized Chhagan Bhujbal:

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तुरुंगात असताना छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्लॅकमेल करायचे, असा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला. ते पंढरपुरात माध्यमांशी बोलत होते. पंढरपुरात त्यांनी विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांच्यावर त्यांनी टीका केली.(Latest Politics News)

रमेश कदम यांची नुकतीच तुरुंगातून जामिनावर सुटका झालीये. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रमेश कदम राजकारणात सक्रिय झालेत. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाप्रकरणी ते तुरुंगात होते. पंढरपूर येथे माध्यमांशी बोलताना कदम म्हणाले की, ते आणि छगन भुजबळ काही काळ एकाच तुरुंगात होते.

त्यावेळी त्यांना तुरुंगातील छगन भूजबळ आणि आत्ताचे भुजबळ कसे आहेत, असा प्रश्न करण्यात आला. याचे उत्तर देताना त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. रमेश कदम म्हणाले की, आत्ताचे छगन भुजबळ आणि आधीच्या भुजबळांमध्ये खूप फरक आहे.

जामिनासाठी भुजबळांची धडपड सुरू होती. आपला जामीन झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा ते कायम शरद पवारांना देत असायचे. रुंगात असताना माझी आणि त्यांची भेट होत असे. त्यावेळी पवार साहेबांनी मला मदत केली पाहिजे. जामिनाला खूपच उशीर होतोय, अशी नाराजी भुजबळांच्या बोलण्यातून जाणवायची पण त्याचवेळी वेगळा मार्ग स्वीकारण्याची धमकी ते पवारांना द्यायचे, असा दावा कदम यांनी केलाय.

जेलमध्ये गेल्यावर ते ८ दिवसात आजारी पडत. त्यांच्या छातीत दुखायचे हे कारणं दाखवून त्यांना नेत्यांची पक्षांची सहानुभूती मिळत आणि ते बेल आउट होत असायचे. आता ते फिट दिसत आहेत. तुरुंगातून सुटका मिळवण्यासाठी त्यांची युक्ता त्यांची काकुळती मी पाहिलेय. छगन भुजबळ हे रोज आजारी पडायचे. त्यांना रोजच उपचाराची गरज पडायची. परंतु आत्ताचे भुजबळ खूपच फीट असल्याचं म्हणत कदम यांनी भुजबळांना टोला मारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT