माजी आमदार आशिष देशमुखांचा काँग्रेसला घरचा आहेर; पाहा Video Saam Tv
महाराष्ट्र

माजी आमदार आशिष देशमुखांचा काँग्रेसला घरचा आहेर; पाहा Video

काटोल विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.

संजय डाफ

नागपूर: काटोल विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. 2002 मध्ये केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना 150 कोटी रुपये खाजगी दलाला मार्फत गुंतवले होते. ही रक्कम परत न मिळाल्यामुळे बँकेला 150 कोटीचं नुकसान झालं आहे. केवळ नागपूरचं नाही तर राज्यातील 12 बँकांना 400 कोटी रुपयांचा चुना लावल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी सुनील केदार यांच्यावर केला आहे. या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे. मात्र असे नेते मंत्री आहेत ही लाजिरवाणी बाब आहे असे मत देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

केदार यांनी सरकारी वकील ज्योती वजानी यांना राजीनामा द्यायला लावला आणि त्यांच्या जागी त्यांचे जवळचे आसिफ कुरेशी यांची नियुक्ती केली असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. कुरेशी जोरकसपणे कोर्टात बाजू मांडणार नाहीत आणि त्यामुळं केदारांची निर्दोष सुटका होईल असा आरोप त्यांनी केला आहे.

त्यामुळं ही नेमणूक स्वीकारू नये, अशी विनंती देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. त्यांच्या जागी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करून त्यांच्याविरुद्ध स्वतंत्रपणे नागपूर कोर्टात खटला चालवावा अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे. आता काँग्रेसच्याच माजी आमदारानं आपल्याच पक्षातील नेत्यावर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तळात चर्चा रंगली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT