Pandharpur News भारत नागणे
महाराष्ट्र

बार्टीतील पार्टी प्रकरणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंचा आंदोलनाचा इशारा...

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टिका करत‌ या प्रकरणी बार्टीच्या अधिकाऱ्यांविरोधात पुण्यात मोर्चा काढणार असल्याचा इशारा माजी मंत्री ढोबळे यांनी‌ दिला आहे.

भारत नागणे

पंढरपूर - बार्टी मध्ये झालेल्या पार्टीचे प्रकरण चांगलेच तापले आहे. यावरून माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर सडकून टिका करत‌ या प्रकरणी बार्टीच्या अधिकाऱ्यांविरोधात पुण्यात मोर्चा काढणार असल्याचा इशारा माजी मंत्री ढोबळे यांनी‌ दिला आहे. पुण्यामधील (Pune) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधील महासंचालक आणि इतर अधिकाऱ्यांनी भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) कार्यक्रमातील ठेकेदाराची बिले मंजूर करण्यासाठी पार्टी घेतली होती.

हे देखील पहा -

यावरून माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी संताप व्यक्त केला आहे. माणुसकीला लाज आणणारी ही घटना आहे. सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांनी तोडपाणी करण्या पेक्षा बार्टी मध्ये लक्ष घालावे. तसेच यात सहभागी संबंधितांवर कडक कारवाई करावी. अन्यथा मागासवर्गीयांच्या वतीने पुण्यात मोर्चा काढणार असल्याचे ढोबळे यांनी इशारा दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT