ravi rana and Bacchu Kadu saam tv
महाराष्ट्र

रवी राणांच्या आरोपानंतर बच्चू कडू प्रचंड आक्रमक; मोठा निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत खलबतं

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Bacchu Kadu News : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि रवी राणा यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी केला. या आरोपानंतर बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांनी १ नोव्हेंबरच्या अल्टीमेटवर कार्यकर्त्यांसबोत बैठकांचा सपाटा लावला आहे. (Bacchu Kadu News Today)

रवी राणा यांनी आरोप केल्यानंतर बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. 'माझ्यावर केलेले आरोपाचे पुरावे येत्या एक तारखेपर्यंत द्यावे, अन्यथा मोठा बॉम्बस्फोट करणार, असे संकेत बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिले आहेत. ' माझ्यासोबत १२ आमदार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. त्यामुळे आता याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय भूमिका घेणार याकडेच सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारला इशारा दिल्यानंतर रवी राणा यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे दुसरीकडे बच्चू कडू अमरावतीत येताच त्यांनी देखील कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू केल्या आहेत. आमदार रवी राणा यांना दिलेल्या १ तारखेच्या अल्टिमेटमवर आज बच्चू कडू यांनी आज कार्यकर्त्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी शेकडो कार्यकर्ते बच्चू कडू यांच्या भेटीला आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे नेमकं बच्चू कडू १ नोव्हेंबर रोजी काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : काल पर्यंत कडू होत...निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉस घरात नेमकं चाललंय काय?

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT