भाजपचे माजी आमदार लवकरच करणार राष्टवादीमध्ये प्रवेश  Saam Tv
महाराष्ट्र

भाजपचे माजी आमदार लवकरच करणार राष्टवादीमध्ये प्रवेश

आर्णी-केळापुर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी बंडाचे निशान हाती घेतले आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

आर्णी-केळापुर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी बंडाचे निशान हाती घेतले आहे. त्यामुळे आता आर्णी- केळापूर मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे असून राजू तोडसाम लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहे.

गत विधानसभा निवडणुकीत माजी आमदार राजू तोडसाम यांना भाजपने उमेदवारी नाकारली होती. त्यांच्या व्यक्तीगत झालेल्या बदनामीचे भांडवल केल्याची भावना तोडसाम समर्थकांकडून व्यक्त केल्या जात आहे. निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने माजी आमदार राजू तोडसाम यांनी अपक्ष उमेदवारीही दाखल केली होती.

दरम्यान तोडसाम यांना २६ हजार पेक्षा जास्त मतदान घेतले. मात्र भाजपचे संदीप धुर्वे विजयी झाले. कालांतराने तोडसाम यांना पक्षात फारसा वाव मिळाला नाही. त्यातून माजी आमदार राजू तोडसाम भाजप विरोधात बंडाचे निशाण हाती घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT