dhule saam tv
महाराष्ट्र

Dhule News : तब्बल दहा दिवसानंतर नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागास यश

नरभक्षक बिबट्याचा अखेर थांबला थैमान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याला जेरबंद करण्यात आले यश

भूषण अहिरे

Dhule News : गेल्या दहा दिवसांपासून नरभक्षक बिबट्याचा सुरू असलेला शोध अखेर आज (साेमवार) संपला. या नरभक्षक बिबट्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. बिबट्याला जाळ्यात पकडून त्यास वनकर्मचा-यांनी कैद केले आहे. (Maharashtra News)

या नरभक्षक बिबट्याने जवळपास तीन लहान चिमुकल्यांचा बळी देखील घेतला आहे. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन अधिकाऱ्यांना आदेशित केलेले होते. त्यानंतर जवळपास दहा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाला या नरभक्षक बिबट्यास जाळ्यात अडकवण्यात यश आले आहे.

धुळे तालुक्यात जवळपास दहा दिवसांपासून या नरभक्षक बिबट्याने चांगलाच थैमान घातला होता. त्यामुळे धुळे तालुक्यात बहुतांश ठिकाणी शेतीची कामे जोरात सुरू असताना देखील शेतकरी शेतात जाण्यास घाबरत होते. परंतु आता या नरभक्षक बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी जेर बंद केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी या नरभक्षक बिबट्याला भुलीचे इंजेक्शन शूट करून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना यश आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई-पुण्यापेक्षा सोलापूर-मुंबई प्रवास सुसाट! 400 किमी प्रवास फक्त एक तासांत

Diabetes : पावसाळ्यात वाढतो मधुमेहाचा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

Maharashtra News Live Update: बीडच्या केज शहरासह परिसरात दमदार पावसाला सुरुवात, शहरातील रस्ते जलमय

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी साकडं, वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी केली 'लाडूतुला'

Hair Care: केस धुतल्यानंतर लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरताय? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT