Nagpur News 
महाराष्ट्र

Nagpur News: भाषणातून केंद्र सरकार- राज्य सरकारवर टीका? भर कार्यक्रमात पद्यश्री राहीबाई पेरेंचा माईकचं केला बंद

इंडियन सायन्स काँग्रेसअंतर्गत गुरुवारी फार्मर्स सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आल्या असताना हा प्रकार घडला आहे.

Gangappa Pujari

Nagpur: भाषणामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यावर टीका केल्याने भर कार्यक्रमात बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या पद्यश्री राहीबाई पेरे यांचा माईक बंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंडियन सायन्स काँग्रेसअंतर्गत गुरुवारी फार्मर्स सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आल्या असताना हा प्रकार घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राहीबाई पेरे या गुरुवारी फार्मर्स सायन्स कॉंग्रेस कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या वेळी मंचावर भाषण करताना त्यांनी  "पद्मश्री पुरस्कार स्विकारायला गेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळने गावात अद्याप विकास पोहोचला नसल्याचे आपण सांगितले. गावात पोहोचण्यासाठी धड रस्ता नाही,  पिण्याचे पाण्यासाठी महिलांना तीन किलोमीटर पायी जावे लागते" असं आपण मोदींना सांगितले, असं पोपरे म्हणाल्या.

"तत्कालीन मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माझ्या गावात येण्याची तयारी दाखवली होती. मी त्यांना त्यावेळी म्हटलं तुम्हाला हेलिकाॅप्टर घेऊन गावात यावे लागेल. कारण गावात रस्ताच नाही. पाटील यांच्या भेटीनंतरही गावात कुठलाही फरक पडला नाही. बीज माता म्हणून जरी प्रसिद्धी मिळाली असली तरी माझ्या गावातील आणि परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळाले नाही," असेही त्या पुढे म्हणाल्या.

मात्र याचवेळी त्या बोलत असताना त्यांचा माईक बंद केल्याचा आरोप होत आहे. भारतीय सायन्स काँग्रेसच्या कन्वेनियर आणि भाजपच्या माजी नगरसेविका कल्पना पांडे यांनी त्यांच्या समोरील माईक बंद केल्याचा आरोप होत आहे. या घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji Recipe : मुंबई स्टाईल पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची? सीक्रेट रेसिपी आताच लिहून घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड घाटात वाहतूक कोंडी

शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार? मी तुम्हाला इतिहासात नेते म्हणत सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

लाडक्या बायकोसाठी चांदीच्या जोडव्याचे 5 सुंदर डिझाईन्स

Nashik News: भावली धबधबा मारहाण प्रकरण, पर्यटकांना मारहाण करतानाचा नवा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT