Yavatmal Marriage News, Yavatmal Latest Marathi News Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! निकाहच्या जेवणानंतर १६० वऱ्हाड्यांना विषबाधा; १० जणांची प्रकृती गंभीर

यापैकी आठ ते दहा वऱ्हाडी गंभीर असल्याचं सांगण्यात आलं.

Satish Daud

संजय राठोड

यवतमाळ: पुसद तालुक्यातील इसापूर धरण येथे काल एक निकाह समारंभ पार पडला. निकाहानंतर जेवणातून तब्बल १६० वऱ्हाड्यांना विषबाधा झाली. त्यानंतर तातडीने सर्व वऱ्हाडींना शेबांळपिंपरी, पुसद, नांदेड आणि कळमनुरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्यांपैकी ९५ वऱ्हाडी हे हिंगोलीतील असल्याची माहिती आहे. यापैकी आठ ते दहा जण गंभीर असल्याचं सांगण्यात आलं. (Yavatmal Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अदमदखॉ असुद्दीनखॉ यांच्या मुलीचा निकाह होता. नांदेड जिल्ह्यातील कळमनुरी येथील वर आणि वऱ्हाडी मंडळी निकाहसाठी दाखल झाले. एका उर्दू शाळेत दुपारी निकाह झाला. विवाह सोहळा आटोपल्यानंतर सायंकाळी चार वाजता या सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. मात्र. जेवणानंतर यापैकी जवळपास २०० जणांना विषबाधा झाली. अनेकांना उलट्या झाल्या. काहींना मळमळ सुरू झाली. दरम्यान, या वऱ्हाडींनी कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर उपचार देखील सुरू केले, मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने, कळमनुरी रुग्णालय प्रशासनाने हिंगोली हिंगोली जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास कळवून अतिरिक्त डॉक्टर बोलून रुग्णांवर उपचार सुरू केले. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत या विषबाधेचे कळमनुरी च्या उपजिल्हा रुग्णालयात तब्बल ९० पेक्षा अधिक रुग्ण भरती झाले होते, यामध्ये ७ लहान मुलांचा देखील समावेश आहे, दरम्यान याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी नोंद केली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT