gutka pan masala Saam Tv
महाराष्ट्र

Dhule Crime : अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; गोदाम वर छापा टाकून गुटख्याचा मोठा साठा जप्त

Major gutka seizure in Dhule Maharashtra : धुळेमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाल्याची बेकायदा विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे आल्या होत्या. या दरम्यान नाशिक गुप्तचर विभागाने धुळे येथे मोठी कारवाई केली आहे. यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Saam Tv

धुळे: संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत गुटखा विक्री करणाऱ्यांसह अवैध गुटखा पुरवठादार आणि विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगरला आहे. शुक्रवारी धुळे शहरातील वल्लीपुरा मौलवी गंज परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. ही कारवाई नाशिक गुप्तचर विभागाच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने व मिळालेल्या गुप्त माहितीनुसार केली आहे.

आझाद नगर पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने गोडाऊनवर छापा टाकला असता, मिराज, रजनीगंधा, विमल, राजनिवास यांसारख्या विविध ब्रँडच्या गुटखा व पानमसाल्याचा मोठ्या प्रमाणातसाठा आढळून आला. महाराष्ट्र शासनाने गुटखा आणि पानमसाला विक्री, वाहतूक व साठवणुकीस बंदी घातली असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात हा साठा करण्यात आला होता.

सदर गोडाऊन सील करण्याची प्रक्रिया सुरू असून, जप्त केलेल्या मालाची किंमत लाखोंच्या घरात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने पुढील तपास सुरू केला असून, गोडाऊनच्या मालकाविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT