अकोल्यात चंद्रिका नदीचे उग्र रूप; आठ गावांचा संपर्क तुटला ! जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोल्यात चंद्रिका नदीचे उग्र रूप; आठ गावांचा संपर्क तुटला !

अकोट तालुक्यातील मुंडगाव जवळील चंद्रिका नदीला पूर आला आहे. पुरामुळे आठ गावांचा संपर्क तुटला आहे.

जयेश गावंडे

अकोला : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने हाहा:कार माजवला आहे. आज अकोल्यातील अकोट तालुक्यात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. अकोट तालुक्यातील मुंडगाव जवळील चंद्रिका नदीला पूर आला आहे. पुरामुळे नदीकाठच्या लोहरी, वणी, वारुळा, आळेगाव, बलेगाव, लमाकानीसह इतर दोन गावांचा संपर्क तुटला आहे.

हे देखील पहा -

अकोट तालुक्यातील मुंडगाव जवळील चंद्रिका नदीवरील पूल हा दळणवळणासाठी महत्त्वाचा पूल आहे. मात्र नदीच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पहा फोटो :

चंद्रिका नदीवरील पूल
चंद्रिका नदीवरील पूल

काल पासून मुंडगाव मधील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. नदीने रौद्ररुप धारण केल्यामुळे नदीच्या पात्रातील पाणी प्रवाह बदलून नदीकाठच्या शेतात घुसले आहे. या पाण्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : 5 राशींना मिळणार खुशखबर! देवीच्या दर्शनाने दिवस शांततेत जाईल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

SCROLL FOR NEXT