vashishti river, koyna dam, chiplun saam tv
महाराष्ट्र

Koyna Dam : 'काेयने' मुळे 'वाशिष्ठी' ला पूराचा धाेका; पोफळी वीज निर्मिती प्रकल्प अधिकाऱ्यांना भीती

भविष्यात गळती माेठी होऊन तीवरे धरणासारखे दुर्घटना घडू शकते तज्ञांचे मत.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश काेळी

Chiplun News : कोयना धरणातून वीजनिर्मिती प्रकल्पाकडे जाणाऱ्या सर्चवेलला दोन वर्षांपूर्वी पडलेल्या भागदाडाची तीव्रता आज (मंगळवार) अचानक वाढली आहे. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. चिपळूण येथील वाशिष्ठी नदीला पूर येण्याची दाट शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. (vashishti river latest marathi news)

कोयना धरणातून सर्चवेल मध्ये केला जाणार पाण्याचा विसर्ग तात्काळ बंद केल्यास पुढील धोका टाळता येईल अशी माहिती पोफळी वीज निर्मिती प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या कुंभार्ली घाटातील डोंगरामधून या सर्चवेल मधून भगदाड पडलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. (Maharashtra News)

त्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पोफळी पॉवर हाऊस पहिला व दुसऱ्या टप्प्यात कोयना धरणातून येणाऱ्या सर्चवेलला हे भगदाड दोन वर्षांपूर्वी पडले होते आज याची तीव्रता अचानक वाढली आहे.

काेयना धरणाचे (koyna dam) पाणी ज्या ठिकाणावरून वीज निर्मितीला आणले जाते त्या ठिकाणीच गळती लागल्याने चिंतेचे वातावरण समोर आले असले तरी याबाबत जलसिंचन विभागातील एकही अधिकारी बोलायला तयार नाही. मात्र वीज निर्मिती ज्यावेळी केली जाते त्यावेळेला या डोंगरातून लाखो लिटर पाणी हे गळतीच्या माध्यमातून वाया जात आहे. भविष्यात ही गळती माेठी होऊन तीवरे धरणासारखे दुर्घटना घडू शकते असे तज्ञांनी तसेच जाणकारांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT