flood hits gadchiroli, chandrapur,  saam tv
महाराष्ट्र

Flood Hits Gadchiroli : पावसाचा हाहाकार... दक्षिण गडचिरोली चंद्रपूरचा संपर्क तुटला

wainganga river flooded : नदीकाठच्या गावांनी सर्तक राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Siddharth Latkar

- मंगेश भांडेकर

Gadchiroli Rain Update : गोसेखुर्द धरणाचे (Gosikhurd Dam) दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीला (wainganga river) पूर आला आहे. वैनगंगेच्या बॅक वॉटरमुळे अहेरी-चंद्रपूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद (aheri chandrapur national highway) झाल्याने दक्षिण गडचिरोली जिल्ह्याचा चंद्रपूर जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. (Maharashtra News)

गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 8 प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. तसेच 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.

दरम्यान गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीला पूर आला आहे. वैनगंगेच्या बॅक वॉटरमुळे अहेरी-चंद्रपूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्याने दक्षिण गडचिरोली जिल्ह्याचा चंद्रपूर जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल 12 प्रमुख मार्ग सद्यस्थितीत बंद झाले आहेत. आलापल्ली- ताडगांव -भामरागड, भामरागड - लाहेरी व आष्टी – गोंडपिपरी- चंद्रपुर या राष्ट्रीय महामार्गासह 4 राज्य मार्ग व 5 जिल्हा मार्ग बंद झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homeguard Recruitment : होमगार्डसाठी वयोमर्यादा किती आहे? जाणून घ्या महत्वाचे नियम अन् शेवटची तारीख

Maharashtra Nagar Parishad Live : शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी पकडलं

सिन्नरमध्ये मतदानावेळी वाद; अजित पवारांच्या उमेदवाराच्या समर्थकावर स्प्रे हल्ला, २ गटात तुफान हाणामारी|VIDEO

Alibaug Travel : अलिबागमध्ये लपलेले सुंदर रत्न, निसर्ग सौंदर्याने सजलाय 'हा' समुद्रकिनारा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे मी आणि समरजीतसिंह घाडगे एकत्र आलो - मंत्री हसन मुश्रीफ

SCROLL FOR NEXT