Sangli Accident News
Sangli Accident News saam tv
महाराष्ट्र

Sangli Accident News: देवदर्शन करून परतताना काळाचा घाला; विजापूर-गुहागर महामार्गावर कारचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू

विजय पाटील

Sangli News: सांगलीतून अपघाताचं एक धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. सांगलीच्या जतमधील विजापूर-गुहागर राज्य मार्गावरील अमृतवाडी फाट्याजवळ कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री कारचा हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या जतमध्ये विजापूर-गुहागर राज्य मार्गावरील अमृतवाडी फाट्याजवळ मध्यरात्री कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चार जण आणि कार चालक अशा एकूण पाच जणांचा मृत्यू आहे. या अपघातात एक मुलगा देखील जखमी आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सांगलीच्या जतच्या विजापूर-गुहागर राज्य मार्गावर जत पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्याजवळ अपघात झाला. कारने समोरून येणाऱ्या ट्रकला चुकविण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चार आणि चालक असे पाच जणांचा मृत्यू झाल. गाणगापूरला दत्त देवाचे दर्शन घेऊन विजयपुर मार्गे जतकडे येत असताना हा अपघात रात्री घडला आहे.

या अपघातात चालक दत्ता हरीबा चव्हाण वय 40 रा जत, नामदेव पुनाप्पा सावंत 65, पदमिनी नामदेव सावंत 60, श्लोक आकाशदिप सावंत वय 8 मयुरी आकाशदिप सावंत वय 38 सर्व जत मध्ये राहण्यास आहेत. हे एकाच कुटुंबातील आहेत. या अपघातात वरद सावंत हा वय दहा वर्ष हा गंभीर जखमी झाला आहे.

अपघात घडताच प्रथम दर्शनी दोघेजण जखमी अवस्थेत असलेल्या आई मयुरी सावंत व मुलगा वरद सावंत यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र मयुरी सावंत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर वरद यास तातडीने पुढील उपचारासाठी सांगलीला नेण्यात आले. भाडे तत्वावर कार घेऊन ते देवदर्शनासाठी गेले होते. तर या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे.

चार जणांचे मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी आणण्यात आले. चालक दत्ता हा जखमी होता. त्यास उपचारांसाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. मोठा अपघात घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. जत ग्रामीण रुग्णालयात देखील मोठी गर्दी झाली होती. पोलिस निरीक्षक राजेश रामआघरे यांनी तातडीने भेट देऊन घटनास्थळी भेट दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासघात केला - फडणवीस!

Lok Sabha Election: गुजरातनंतर मध्यप्रदेशातही घडला 'सूरत कांड', इंदूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार फितूर; उमेदवारी घेतली मागे

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या सभेला राज ठाकरेंच्या सभेने प्रत्युत्तर..

Today's Marathi News Live : पुण्यात राहुल गांधींची सभा, ३ मे ला Sspms ग्राउंडवर होणार सभा

Shantigiri Maharaj: नाशिकमध्ये शिंदे गटाकडून शांतीगिरी महाराजांना उमेदवारी?

SCROLL FOR NEXT