Nanded Car Accident News Saam TV
महाराष्ट्र

Nanded News: भरधाव कार पुलावरून खाली कोसळली; भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, नांदेड जिल्ह्यातील घटना

Satish Daud

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही नांदेड

Nanded Car Accident News

नांदेड जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. भोकर-उमरी रस्त्यावरील मोघाळीजवळील कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेली कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट पुलावरून खाली कोसळली. या घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी (८ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रात्रीची वेळ व नाल्यात पाणी असल्याने कारमधील प्रवाशांना बाहेर निघण्यास मोठा अडथळा निर्माण झाला. त्यातील काही जणांनी आरडाओरड केल्याने रब्बी पिकांच्या रक्षणासाठी जवळच्या शेतात असलेले मोघाळी व हाळदा येथील काही नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी वेळेवर मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले. तसेच अपघाताची माहिती भोकर पोलिसांना दिली. (Latest Marathi News)

सविता श्याम भालेराव (वय २५), प्रीती परमेश्वर भालेराव (वय ८) सुशील मारोती गायकवाड (वय ९) रेखाबाई परमेश्वर भालेराव(वय ३०),अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव(वय २८) अशी मृतांची नावे आहेत. मृत व्यक्ती भोकर तालुक्यातील (Nanded News) रेणापूर गावातील रहिवासी आहेत.

अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त भालेराव आणि गायकवाड कुटुंब मजुरीसाठी तेलंगणा राज्यातील नवीपेठ येथे राहत होते .

नातेवाईकाच्या मुलीचा वाढदिवस असल्याने गुरुवारी (८ फेब्रुवारी) ते नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे आले होते. कार्यक्रम आटोपून ते कारने तेलंगणा येथे जात होते. दरम्यान, भोकर-उमरी रस्त्यावरील मोघाळीजवळील रात्री चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलावरू खाली कोसळली.

या अपघातात तिघांचा जागेवरच तर दोघांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला, तीन लहान मुले आणि अन्य दोन अशा ५ जणांचा समावेश आहे. या घटनेनं संपूर्ण रेणापूर गावावर शोककळा पसरली आहे. हा अपघात नेमका कसा झाला? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT