Jalna Crime News 
महाराष्ट्र

Jalna : मध्यरात्री अनर्थ घडले! जालन्यात ५ मजुरांचा जागीच मृत्यू, वाळूखाळी दबल्याने जीव गेला

Jalna Crime News : गाढ झोपेत असताना जालन्यात काळाने घाला घातला. पाच मजुराचा मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करण्यात येत आहे. १३ वर्षीय मुलीला आणि महिलेला वाचवण्यात यश आले आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे पाटील

Jalna News : जालन्यात मजुराच्या पत्र्याच्या शेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाा. जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मध्यरात्री साडेतीन वाजता दुर्दैवी घटना घडली. महिला आणि १३ वर्षीय मुलीला वाचवण्यात यश आले, पण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. जाफराबाद तालुक्यातील पासोडी - चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम करणारे मजूर होते.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे. (Five Workers Die as Sand Dumper Crushes Makeshift Shed During Midnight)

जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मजुराच्या पत्र्याच्याशेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथील ही दुर्दैवी घटना घडली. मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमध्ये पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका तेरा वर्षीय मुलीला आणि एका महिलेला वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान जाफराबाद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत आहे.

जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम करणारे मजूर पुलाशेजारीच पत्र्याचं शेड बांधून राहत होते. मध्यरात्री गाढ झोपेत असतानाच एका वाळूच्या टिप्परने त्यांच्या पत्र्याच्या शेडशेजारी वाळू खाली केली. त्या वाळूमध्ये दबून या पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT