Vitthal Rukmini Pandharpur, Vitthal Rukmini Mandir News, Pandharpur Latest Marathi News saam tv
महाराष्ट्र

Pandharpur : आषाढी यात्रेत विठ्ठलास पाच कोटी सत्तर लाखांची देणगी अर्पण

काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा पालखी साेहळयास वारकरी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

भारत नागणे

पंढरपूर : दोन वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी पंढरपूर (pandharpur) आषाढी यात्रेचा (ashadhi wari) सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यात्रेदरम्यान सुमारे सात ते आठ लाख भाविकांनी विठुरायाचे (vitthal) पदस्पर्श आणि मुख दर्शन घेतले. या दरम्यान भाविकांनी विठ्ठलाच्या चरणावर जवळपास पाच कोटी सत्तर लाख रुपयांची देणगी अर्पण केली आहे. दोन वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आषाढी यात्रेत एक कोटी तीस लाख रुपयांची देणगीत भर पडली आहे अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. (pandharpur latest marathi news)

काेराेनामुळे गेली दोन वर्ष आषाढी वारी मर्यादित वारक-यांच्या उपस्थितीत पार पाडली. त्यामुळे यंदा पंढरपूरात भाविकांची मांदियाळी हाेती. यंदाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यंदा सात ते आठ लाख भाविक पंढरपूरात दाखल झाले हाेते.

सन 2019 मध्ये झालेल्या आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर समितीला चार कोटी चाळीस लाख रुपयांची देणगी मिळाली होती. यावर्षी विठ्ठलाला सोने आणि चांदीचे दागिने ही मोठ्या प्रमाणावर भाविकांनी दान केले आहेत. यंदाच्या आषाढी यात्रेत एक कोटी तीस लाख रुपयांची देणगीत भर पडली आहे.

भाविकांनी मंदिर समितीला देणगी स्वरूपात दान केल्यास समितीच्या वतीने भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होईल असेही मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarkari Yojana : मुलगी असेल तर सरकार देणार ₹25 हजारांची मदत; जाणून घ्या कन्या सुमंगला योजनेच्या अटी आणि अर्जाची प्रोसेस

Mumbai : मुंबईकरांची पाणी टंचाईची चिंता संपली! महत्त्वाच्या ७ धरणांमध्ये ९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा

Govinda: गोविंदा संतापला; कायदेशीर कारवाईचा कडक इशारा, अफवा पसरवणाऱ्यांना थेट १०० कोटींचा फटका

Bathroom Tips : बाथरूममधील पिवळे डाग कितीही घासले तरी जात नाहीत? हे घरगुती उपाय करतील मदत

NEET, TET नंतर महाराष्ट्रात आणखी एक पेपर फुटला, बहिणीसाठी शिक्षिकेनेच रचला कट

SCROLL FOR NEXT