भंडाऱ्यात आढळला डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला रुग्ण! Saam Tv
महाराष्ट्र

भंडाऱ्यात आढळला डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला रुग्ण!

कोरोनाचा नवा व्हेरिएंट म्हणून गणला जाणाऱ्या डेल्टा प्लस विषाणुचा पहिला रुग्ण भंडारा जिल्ह्यात आढळला आहे.

अभिजीत घोरमारे

अभिजीत घोरमारे

भंडारा : कोरोनाचा नवा व्हेरिएंट Corona Variant म्हणून गणला जाणाऱ्या डेल्टा प्लस विषाणुचा पहिला रुग्ण भंडारा जिल्ह्यात आढळला आहे. भंडारा Bhandara तालुक्यातील एका रुग्णाच्या स्त्रावाचे नमुने जून June महिन्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच आला असून संबधित रुग्णात डेल्टा प्लस Delta Plus विषाणु सापडला आहे.

हे देखील पहा-

परंतु हा रुग्ण बरा झाला असून त्याच्या संपर्कातील लोकांची ही तपासणी केली असता, कोणालाच डेल्टा प्लसचे लक्षण आढळून आली नाहीत. मात्र डेल्टा प्लस रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून डेल्टा प्लस जिल्ह्यात आगमन झाल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

दरम्यान, काल राज्यात आणखी 27 डेल्टा प्लस Delta Plus रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण डेल्टा प्लस रुग्णांची संख्या 103 वर जाऊन पोहोचली आहे. राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटच्या नव्या 27 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या काही काळात डेल्टा प्लस व्हेरियंट राज्याची चिंता वाढवणारा ठरु शकतो.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT