Mahayuti News Saam Tv
महाराष्ट्र

Cabinet Meeting : नव्या सरकारची नव्या वर्षाची पहिली बैठक, अजित पवार गैरहजर राहणार?

First Cabinet Meeting Today : नव्या वर्षातील पहिल्या बैठकीला अजित पवार गैरहजर राहण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार सध्या राज्याबाहेर आहेत. त्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचे समजतेय.

Namdeo Kumbhar

नव्या सरकारची नव्या वर्षाची पहिली बैठक आज (गुरुवारी) होणार आहे. खातेवाटप झाल्यानंतर मुंबईत होणारी ही पहिलीच बैठक असेल. दुपारी १२ वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्याचे समोर आलेय. खातेवाटप होऊ आठवडा झाला तरीही काही मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जातेय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या राज्याबाहेर असल्याचं समजतेय, त्यामुळे ते बैठकीला गैरहजर राहणार असल्याचे समजतेय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आजच्या बैठकीत काही चर्चा होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांचं नाव यामध्ये आल्यामुळे बैठकीत काही निर्णय होणार का? याचीही चर्चा सुरू आहे.

खातेवाटपानंतर ही पहिलीच बैठक असेल. सर्व मंत्र्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खातेवाटपानंतरही अद्याप काही नेत्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व आलेय. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणता महत्त्वाचा निर्णय होणार? याची चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

High cholesterol: सकाळच्या या 4 सवयींमुळे नसांमध्ये जमा होतंय घाणेरडं कोलेस्ट्रॉल; आजच बदला जीवनशैली

SCROLL FOR NEXT