गोंदियातील सामाजिक कार्यकर्त्यावर अज्ञाताकडून गोळीबार! SaamTVNews
महाराष्ट्र

गोंदियातील सामाजिक कार्यकर्त्यावर अज्ञाताकडून गोळीबार!

गोंदिया शहरातील सामाजिक कार्यकर्ते धनेंद्र भुरले यांच्यावर अज्ञात आरोपीने गोळीबार केला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अभिजीत घोरमारे

गोंदिया : गोंदिया शहरातील सामाजिक कार्यकर्ते धनेंद्र भुरले यांच्यावर अज्ञात आरोपीने गोळीबार केला असून त्यांच्यावर गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोंदिया (Gondia) शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या धनेंद्र भुरले यांच्या शेतात अनाथालयाचे बांधकाम सुरु असून भुरले या बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेले होते.

हे देखील पहा :

दरम्यान, संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन करून तुम्ही कुठे आहात अशी विचारणा केली. भुरले यांनी मी शेतावरून घरी परत येत आहे अशी माहिती संबंधितास फोन वरून दिली. त्यांनतर ते घराकडे निघाले.

गोंदिया शहराला लागून असलेल्या कटंगी गावाजवळ येताच अज्ञात आरोपीने त्यांना दुचाकीवरून (Bike) येत रस्त्यात अडवले व त्यांच्यावर गोळीबार केला. छऱ्याच्या बंदुकीतून (Pistol) करण्यात आलेल्या या गोळीबारात (Firing) भुरले यांच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून राम नगर पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडका; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

Mumbai News : मुंबई महापालिकेत खळबळ! दोन बड्या अधिकाऱ्यांचा मोठा गेम उघड, लाचखोरीचा गुन्हा

Pradeep Purnekar: ठाण्यात ठाकरेसेनेच्या विभाग प्रमुखावर कार्यालयातच गोळीबार; हत्येचा थरारक घटनाक्रम

SCROLL FOR NEXT