नागपूरमध्ये युवकावर गुंडांचा गोळीबार ! 
महाराष्ट्र

नागपूरमध्ये युवकावर गुंडांकडून गोळीबार !

नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन हद्दीतील गोवा कॉलोनीत गुंडांनी युवकावर गोळीबार केल्याची घटना. सुदैवाने नेम चुकल्याने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. 6 गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर शहरातील गोवा कॉलनीमध्ये, हातगाड्याचा व्यवसाय असणारे काही युवक गप्पा मारत बसले होते. याच वेळी दारूच्या नशेत बेभान झालेले दोन गुंड त्या ठिकाणी आले व जोरदार शिवीगाळ करायला लागले. तिथे बसलेल्या युवकांपैकी एकाने त्याला शिवीगाळ करू नकोस म्हणून हटकले.

हे देखील पहा -

मात्र हे गुंड त्याला सुद्धा शिवीगाळ करायला लागले. त्यामुळे या युवकाने एका गुंडाच्या कानशिलात लगावली. त्यामुळे रागात येऊन त्याचा बदल घेण्यासाठी काही वेळाने हे दारुडे आपल्या 6 मित्रांना घेऊन तिथे पोहचले आणि शिवीगाळ करत चापट मारणाऱ्या युवकाला शोधू लागले. त्या युवकाला शोधत असतांनाच त्यातील एका गुंडाने त्याच्याजवळ असणाऱ्या गावठी पिस्तुलातून त्या युवकाच्या दिशेने चार वेळा गोळ्या झाडल्या. मात्र नेम चुकल्याने या युवकाला कोणताही धोका झाला नाही व त्याचा जीव वाचला.

आलेल्या इतर गुंडांकडे सुद्धा शस्त्र असल्याचे पाहून वस्तीतील नागरिकांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली तेव्हा हे गुंड पळून गेले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी देखील या गुंडांचा शोध घेत 6 जणांना अटक करून त्यांच्या कडे असलेले शस्त्र जप्त केले आहेत. दारूच्या नशेत क्षुल्लक कारणावरून हा वाद झाला आणि त्याच रूपांतर गोळीबाराच्या घटनेत झाले. सुदैवाने अनर्थ टळला असला तरी परिसरात मात्र मोठी दहशत निर्माण झाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT