Solapur News Saam Tv
महाराष्ट्र

Solapur News : माजी मंत्र्याच्या बंगल्यात फटाके फेकले, बार्शीत पाच तरुणांविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी पाच तरुणांविरोधात बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर - बार्शी (Barshi) तालुक्यात तरुणांच्या एका टोळक्याने चक्क माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बंगल्यात फटाके फेकल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पाच तरुणांविरोधात बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्यात येत होती. संपूर्ण राज्यात फाटक्याची आतषबाजी सुरु होती. (Solpaur Latest News)

मात्र सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात तरुणांच्या एका टोळक्याने चक्क माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बंगल्यात फटाके फेकल्याची घटना घडली. जीवितास आणि मालमत्तेचं नुकसान करण्याच्या हेतूने कृत्य केल्याच्या आरोपातून पाच तरुणांच्या विरोधात बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

23 ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास बंगल्याच्या गेटसमोर फटाके फोडण्याचा आवाज आला. या आवाजामुळे घरातील सर्वजण जागे झाले. त्यांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले आता पाच जण गेटसमोर फटाके फोडत असल्याचे दिसून आले.

सीसीटीव्हीमध्ये एक फटका बंगल्याच्या दिशेने तोंड करुन पेटवल्याचे दिसत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या सर्व घटनेची पाहणी केल्यानंतर दिलीप सोपल यांनी बार्शीतल्या पाच जणांच्या विरोधात तक्रारी अर्ज दिले. या प्रकरणी काल 3 नोव्हेंबर रोजी या पाच तरुणांविरोधात बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते, निलेश मस्के, अंबादास रणझुंजारे, महेश पवार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Inheritance Rules: मृत्यूपत्र न करता वडिलांचं निधन झाल्यास संपत्तीवर पहिला हक्क कोणाचा? मुलाचा की मुलीचा

Maharashtra News Live Update: उल्हासनगरमध्ये भाजपा शिवसेने विरोधात आक्रमक

Ghee Benefits: रोज रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाल्ल्याने शरीरात होतात ५ चमत्कारिक बदल

Government Pension Yojana: छोट्या व्यापाऱ्यांसाठी केंद्राची पेन्शन योजना; वयाच्या 60 नंतर मिळणार दरमहा ₹3,000 पेन्शन

मोठी बातमी! महायुतीचा पुण्याचा तिढा सुटला, जागावाटपाचा नवा फॉर्म्युलाही समोर, राष्ट्रवादी-शिवसेनेला कोणती जागा?

SCROLL FOR NEXT