satara saam tv
महाराष्ट्र

Satara Fire News : पिंपोडे बुद्रुक गावात घराला आग, नागरिकांसह वाईचे फायर ब्रिगेड घटनास्थळी धावलं; 60 लाखांचे नुकसान

या भीषण आगीमुळे मोठ्या प्रमाणावर पिंपोडे बुद्रुक येथील वातावरण भयभीत झाल्याचे दिसून आले.

ओंकार कदम

Satara News : काेरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील बस स्थानक परिसरात असणाऱ्या घराला व दुकानाला आज (बुधवार) पहाटेच्या दरम्यान शॉटसर्किटमुळे भीषण आग लागली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. (Maharashtra News)

पिंपोडे बुद्रुक येथील बस स्थानक परिसरात असणाऱ्या दत्तात्रय काशिनाथ महाजन यांच्या राहत्या घराला व त्यांनी दिलेल्या भाडेतत्त्वावरती असणाऱ्या दुकान ॲग्रो हायटेक या अनिल ढोले यांच्या शेतीविषयक दुकानाला आज पहाटेच्या दरम्यान भीषण आग (fire) लागली.

या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर परिसरात दूरवर आगीचे लोट व धूर पसरलेला दिसून आला. पिंपोडे बुद्रुक येथील नागरिकांनी आग विझविणामध्ये अथक परिश्रम घेतले. तसेच वाई (wai) अग्निशामक दलाच्या (fire brigade) वतीनेही आग विझविण्यात आली. या लागलेल्या भीषण आगीमुळे मोठ्या प्रमाणावर पिंपोडे बुद्रुक येथील वातावरण भयभीत झाल्याचे दिसून आले.

दरम्यान या आगीत काेणतीही जिवीत हानी झालेली नाही. या घटनेत सुमारे 60 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bottle Gourd Leaves Benefits: आरोग्याचा खजिना, दररोज दुधी भोपळ्याची पाने चावून खाल्ल्याने होतील भन्नाट फायदे

Maharashtra Live News Update: वसई विरार महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून पृथ्वीराज बी पी यांची नियुक्ती

Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?

राज्याच्या प्रशासनात उलथापालथ, तुकाराम मुंढे यांच्यासह १० बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

SCROLL FOR NEXT