fire broke in akola near shastri stadium.  saam tv
महाराष्ट्र

Akola Fire News : अकाेल्यात माेठी दुर्घटना टळली, फटाका बाजारनजीक भीषण आग

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत.

Siddharth Latkar

- हर्षदा सोनोने

Akola Fire News :

अकोला शहरातील शास्त्री स्टेडियम जवळील भंगार बाजारात आज (शुक्रवार) माेठी आग लागली. यामध्ये माेठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाने आग विझविण्यासाठी तातडीने प्रयत्न केले. दरम्यान परिसरातच दिवाळी निमित्त (Diwali Festival) फटाके स्टाॅल उभारण्यात आले आहेत. या आगी झळ तेथेपर्यंत न पाेचल्याने माेठी दुर्घना टळली आहे. (Maharashtra News)

अकोल्यातील (akola) शास्त्री स्टेडियम जवळील भंगार बाजाराला आज सकाळच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत अंदाजे 7 ते 8 भंगार दुकाने जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले.

या पथकाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी कार्यरत आहेत. या आगीने भंगार व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्व साहित्य जळाल्याची माहिती शेख करीम गुलाम महबूब (दुकानदार) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही अशी माहिती सुनील बळगेकर (पोलीस उपनिरीक्षक रामदास पेठ) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

10 हजार देतो, तुझ्या मुलीला पाठव… लॉकअपमधील आरोपी महिलेकडे पोलीसाची घाणेरडी मागणी; ASI थेट तुरुंगात

South Indian Sambar Recipe: अस्सल साऊथ इंडियन स्टाईल सांबार आता बनवा घरीच, ही आहे सोपी रेसिपी

Pune Rain: पुण्यात अवकाळीचा पहिला बळी, अंगावर झाड कोसळून महिलेचा मृत्यू; ३ तासांपासून पावसाचा कहर सुरू, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : धुळे शहरात सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर, पटेल-तटकरेंची अनुपस्थिती? पडद्यामागे काय घडतंय?

SCROLL FOR NEXT