satara, satara fire brigade, ambika furniture godown
satara, satara fire brigade, ambika furniture godown saam tv
महाराष्ट्र

Satara Fire News : साता-यानजीक फर्नीचरच्या गाेदामास भीषण आग, युवकांची धावा धाव; फायर ब्रिगेड दाखल

Siddharth Latkar

Satara News : सातारा शहरानजीकच्या रामनगर परिसरात आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास एका फर्नीचरच्या गाेदामास भीषण आग (fire broke at ambika furniture near satara) लागली. या आगीची माहिती कळताच सातारा पालिकेचे फायर ब्रिगेडचे पथक पाण्याच्या टॅंकरसह घटनास्थळी पाेहचले. या पथकाने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. दरम्यान या आगीत लाखाे रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (Maharashtra News)

रामनगर (satara) येथील अंबिका फर्निचर याच्या गोडाऊनला आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेची माहिती कळताच परिसरातील युवकांनी गाेडाऊनच्या दिशेने धाव घेतली. काहींनी फायर ब्रिगेडला, पाेलिसांनी फाेन केले. घटनास्थळी जमलेल्या युवकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आगीने राैद्र रुप धारण केले हाेते.

पालिकेचे फायर ब्रिगेडचे पथक घटनास्थळी पाेहचले ताेपर्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली हाेती. आगीचा भडक्यामुळे गाेडाऊनच्या आत काेणाला जाता येत नव्हते. फायर ब्रिगेडच्या दाेन ते तीन गाड्या मागविण्यात आले. या पथकाने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. ही घटना नेमकी कशी घडली याचा तपास तालुका पाेलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

SCROLL FOR NEXT