sangli, fire, fire brigade saam tv
महाराष्ट्र

Sangli Fire News : सांगलीत वखारीस भीषण आग; टिंबर परिसरात फायर ब्रिगेडच्या पाच गाड्या पाेहचल्या

आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे फायर ब्रिगडेच्या कर्मचा-यांनी नमूद केले.

विजय पाटील

Sangli Fire News : सांगलीच्या टिंबर एरियामध्ये (sangli timber area) माळी वखारीस भीषण आग (fire) लागली आहे. या आगीची माहिती कळताच फायर ब्रिगेडच्या (fire brigade) गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. (Breaking Marathi News)

आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास टिंबर एरियामध्ये माळी वखारीला आग लागल्याची माहिती (sangli) महापालिका अग्निशमन विभागाला मिळाली. अग्निशमन अधिकारी विजय पवार व त्यांची टीम तातडीने घटनास्थळी पाेहचली.

ताेपर्यंत आगीने राैद्ररुप धारण केले हाेते. त्यानंतर घटनास्थळी चार ते पाच अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. वखार असल्यामुळे आणि लाकडं असल्यामुळे आगीचे भीषण रूप पाहायला मिळाले.

आग पसरू नये यासाठी महापालिका अग्निशमन विभागाने प्रयत्न केले. नागरिकांनी देखील त्यांना मदत केली. त्याच पद्धतीने आग पसरू नये यासाठी आजूबाजूच्या वखारीमध्ये दक्षता घेतली आहे. आग मोठी असल्यामुळे अद्याप ती आटाेक्यात आलेली नाही. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे फायर ब्रिगडेच्या कर्मचा-यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT