Beed Police Station विनोद जिरे
महाराष्ट्र

बीडच्या RTO कार्यालयात बोगस कर पावत्या, एजंटवर गुन्हा दाखल

गेल्या काही दिवसांपूर्वीच, आरटीओ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करणाऱ्या पाच दलाल एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विनोद जिरे

बीड - आरटीओ कार्यालयात नेमकं चाललय काय ? असाच प्रश्न उपस्थित करणारा प्रकार बीडमध्ये पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच अधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करणार रॅकेट बीड (Beed) आरटीओ (RTO) कार्यालयातील अधिकार्‍यांनी उघडकीस आणलं होतं. तर आता पुन्हा एकदा, बोगस कर पावत्या दाखल करणाऱ्या दलाल एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सुरेखा डेडवाल यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांना, एमएच -43 डी -9535 व एमएच -43 बीजी -7089 प्रो.एस.जे.टूर्स अन्ड ट्रॅव्हल्स या वाहनांचे वाहनकर संगणकावर ऑनलाईन करुन देण्यासाठी दाखल केलेले अर्ज पाहून संशय आला. यामुळं सोबत जोडलेल्या वाहन कर पावत्या एमएच 23 आर -22010000016 , एमएच -22 011136245358 व एमएच -23 आर -21120000007 , एमएच - 21 120641785011 दाखवून सदर पावत्याचे संगणकीय ऑनलाईन सत्यता पडताळणी करण्याचे आदेशित केले होते. त्यामुळं सदर मोटारवाहन पावत्या तपासणी केल्या असता बनावट असल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी सदर अर्ज दाखल करणाऱ्या दलाल एजंट नदीम याच्यावर, बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 420 , 461 , 468 , 471 , 511 भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच, आरटीओ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करणाऱ्या पाच दलाल एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आता पुन्हा एकदा, चक्क कर पावत्या बोगस दाखल करणाऱ्या एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानं, बीडच्या आरटीओ कार्यालयात नेमकं चाललय काय ? असा प्रश्न विचारला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2025 Mega Auction Live: रिषभ पंतवर लागली रेकॉर्डब्रेक बोली! या संघाने लावली २७ कोटींची बोली

Chhatrapati SambhajiNagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 30 वर्षांनंतर अनुराधा चव्हाण-संजना महिला आमदार

Maharashtra Politics : विधीमंडळात विरोधी पक्षनेतेपद असणार का? घटनातज्ज्ञांना काय वाटतं? वाचा

IPL 2025 Mega Auction: श्रेयस अय्यरने इतिहास रचला! लागली IPL स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली

Sanjay Kelkar News : ठाण्याच्या विकासासाठी लवकरच पुढचं धोरण ठरवणार; संजय केळकरांनी मानले मतदारांचे आभार

SCROLL FOR NEXT