पेट्रोलचे थेंब अंगावर उडल्याने वाद, पंपावर महिलांमध्ये हाणामारी, VIDEO VIRAL Saam Tv
महाराष्ट्र

पेट्रोलचे थेंब अंगावर उडल्याने वाद, पंपावर महिलांमध्ये हाणामारी, VIDEO VIRAL

नागपूर शहरात पेट्रोल पंपावर महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

नागपूर : नागपूर शहरात पेट्रोल पंपावर महिलांमध्ये हाणामारी (Women fight in Nagpur) झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Women fight video goes viral) होत आहे. नागपूर शहरात मेडिकल चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पेट्रोल भरत असताना कपड्यावर पेट्रोलचे थेंब उडल्याने वाद झाला आणि याच वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले आहे. (fight of women in nagpur petrol pump video goes viral)

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात एक महिला पंपावर पेट्रोल भरायला गेली होती. पेट्रोल भरत असताना तिच्या कपड्यांवर पेट्रोलचे काही थेंब उडाले. यानंतर त्या महिलने पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोप पंपावर कर्मचाऱ्याला मारहाण होत असल्याचे बघून पंपावरील इतर महिलाही पुढे आले आणि त्यांनी मिळून संबंधित महिलेला मारहाण करण्यात आली आहे.

पेट्रोल पंपावर महिला कर्मचाऱ्यांनी भर रस्त्यात एका महिलेला जबरदस्त मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये इंडियन ऑईल पेट्रोल कंपनीच्या ३ महिला लाल रंगांचा ड्रेस घातलेल्या एका महिलेला भर रस्त्यामध्ये मारत असल्याचे दिसून येत आहे. ही घटना घडली त्यावेळेस पेट्रोल पंपावर इतरही नागरिक उपस्थित होते. उपस्थित असलेल्या नागरिकांपैकी काहींनी आपल्या मोबाइलमध्ये हा वाद आणि हाणामारीची घटना कैद केली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ आता सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Recruitment: खुशखबर! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ५०,००० रुपये; आजच अर्ज करा

Shravan Somwar Shivamuth: श्रावणात पहिल्या सोमवारी शंकराला कोणती शिवामूठ वाहावी?

Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाची कडक ॲक्शन; 'किंगडम'चा जबरी ट्रेलर, पाहा VIDEO

Needle-free injection Nagpur: सुई, सूज, वेदना यापैकी काहीच नाही! नागपुरात मिळतंय सुईशिवाय इंजेक्शन

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

SCROLL FOR NEXT