Nagapur Crime News
Nagapur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Crime News: पैशांच्या वादातून सख्खे मित्र पक्के वैरी; धारदार शस्त्राने वार करत हत्या

Ruchika Jadhav

Nagpur Crime News: नागपूर पोलीस स्टेशन हद्दीत काल (रविवारी) एक धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशन हद्दीतील गोळीबार चौक येथे एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. पैशांच्या वादातून तरुणाची चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Nagpur Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, विजय असे मृतकाचे नावं असून बबलू उर्फ संजय सत्रामवार असे आरोपीचे नाव आहे. हे दोघेही गोळीबार चौक परिसरात कचरा वेचण्याचे काम करत होते. कचरा वेचून झाल्यावर जमलेल्या पैशांची दोघेही दारू प्यायचे. काल रात्री देखील नेहमीप्रमाणे त्यांनी कचरा गोळा केला आणि एकत्र भेटले त्यावेळी पैशांवरून दोघांमध्ये भांडण झाले. काही वेळाने त्यांच्यातील ही बाचाबाची हाणामारीमध्ये बदलली गेली.

यावेळी बबलूने त्याच्या जवळ असलेल्या चाकूने विजयवर सपासप वार केले. यात तो पूर्ण रक्तबंबाळ झाला. रुग्णालयात त्याला घेऊन जाण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेत नागपूर तहसील पोलीस अधिक तपास करत आहेत.

नाशिकमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी

शहरांमध्ये होत असलेल्या गुन्हेगारीच्या घटना पाहता पोलिसांचा धाक उरला आहे की, नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. नाशिकमध्ये देखील काल मेनरोडवर दोन गटात तुफान दंगल झाल्याने एकच धावपळ उडाली. या घटने चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हफ्ता वसुलीवरून हा वाद झाल्याचं म्हटलं जात आहे.

नाशिकच्या मेन रोडला काल रात्री हा प्रकार घडला. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांश लोक खरेदीकरीता मेनरोडवर आले होते. मात्र अचानक दोन गट समोरासमोर आल्याने तुफान दंगल सुरू झाली. दोन्ही गटांकडून दांडके, दगड आणि खुर्च्यांचा वापर केल्याने या हणामारीत चार ते पाच जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटाकडून दगडफेक झाल्याने पाच ते सहा दुकानांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. हातगाड्या लावण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. यातून यापूर्वी देखील वाद झाले आहेत. असा आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केले आहे. एकूणच या घटनेनंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rain News: विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला पडल्या बेशुद्ध; एकीचा मृत्यू

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; सामान्यांना मोठा दिलासा

Thane Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

Gurucharn Singh Return Home : अखेर 'तारक मेहता...'फेम अभिनेता २५ दिवसांनी घरी परतला, गुरूचरण सिंह इतक्या दिवस कुठे होता?

Heat Wave Alert : दिल्लीकरांवर सूर्य कोपला, १४ वर्षांचा तापमानाचा रेकॉर्ड तुटला; ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

SCROLL FOR NEXT