Crime News Saam TV
महाराष्ट्र

Latur: अरे देवा! रांगोळी मोडली म्हणून डोके फोडले; मुसळेवाडी येथील घटना

या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर - शेजाऱ्याच्या अंगना समोरील रांगोळी मोडल्याच्या कारणामुळे २ महिलांना शिवीगाळ करून केसाला धरून मारहाण करीत असल्याचे दिसताच पतीने तुम्ही माझ्या पत्नीस व मुलीस का मारहान करता असे विचारले असताना त्यांचे घरातील सर्वजन हातात काठ्या घेऊन जवळ आले. तसेच तु बाजुला हो असे म्हणुन शिवीगाळ करून हातातील काठीने डोक्यात, पाठीत व डाव्या हातावर मारुन जखमी केल्याची घटना रेणापूर (Latur) तालुक्यातील मुसळेवाडी येथे घडली आहे. (Latur Crime News)

ज्योतीराम किडमोडे मुलीस सासरी सोडुन गावी घरी आले असता पत्नी आहिल्याबाई किडमोडे व मुलगी भाग्यश्री भंडारेच्या लहान मुलीने शेजारी व भावकीतील मिरा किडमोडे, प्रतिभा किडमोडे, राधाबाई किडमोडे यांच्या अंगना समोरील रांगोळी मोडल्याने त्यांनी आहिल्याबाई व भाग्यश्रीला शिवीगाळ करून केसाला धरून मारहाण करीत असल्याचे दिसले. त्यावेळी ज्योतीराम किडमोडे यांनी तुम्ही माझ्या पत्नीस व मुलीस का मारहान करता असे विचारत असताना त्यांच्या घरातील सर्वजन हातात काठ्या घेऊन आले आणि शिवीगाळ करू लागले.

मदन किडमोडे व हानमंत किडमोडे यांनी हातातील काठीने ज्योतीराम किडमोडे यांच्या डोक्यात मारून जखमी केले. तसेच सिताराम किडमोडे याने हातातील काठीने ज्योतीराम किडमोडे यांच्या पाठीत व डाव्या हातावर मारुन जखमी केले.

ज्योतीराम किडमोडे यांना मार लागल्याने डोक्यातून रक्त निघत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ज्योतीराम किडमोडे यांच्या फिर्यादीवरून रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

Maharashtra News Live Update: सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT