Sugar price reaches Rs 80 per kg in Maharashtra during festival season saam tv
महाराष्ट्र

सर्वसामान्यांना महागाईचा झटका, सणासुदीत साखर कडू, रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ

Sugar Turns Bitter at ₹80: ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरानं 80 रुपयांचा आकडा गाठलाय. त्यामुळे, सणांचा गोडवा कमी होणार असला तरी सर्वसामान्यांचं बजेटही कोलमडणार आहे. साखरेचे भाव वाढलेले असताना आणखी कुठल्या गोष्टींचे भाव गगनाला भिडणार आहेत?... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

पुन्हा एकदा महागाईचा भडका उडालाय. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडणार आहे. राज्यातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईला सामोरं जावं लागणार आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती गगनाला भिडल्यात. साखरेच्या दरानं चक्क 80 रुपयांवर मजल मारल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. एव्हंढच नाही तर, वाढत्या दरामुळे बजेट कोलमडल्यानं नागरिकांनी थेट सरकारकडे मागणी केलीये. तर ग्राहकांनी साखर खरेदीकडे पाठ फिरवल्यानं विक्रेतेही मेटाकुटीला आलेत...

राज्यातील विविध जिल्ह्यांत साखर प्रतिकिलो किती रुपयांनी विकली जातेय तेही पाहूयात...

साखर महागली

(दर किलोमध्ये)

नागपूर - 70 रु.

बुलढाणा - 80 रु.

वाशिम - 80 रु.

यवतमाळ 78 रु.

कोल्हापूर - 75 रु.

परभणी - 70 रु.

सांगली - 80 रु.

सातारा- 70 रु.

नाशिक - 75 रु.

पुणे - 72 रु.

पालघर- 70 रु.

मुंबई - 65 रु.

तर दुसरीकडे, साखरेनंतर आता मुंबईकरांचा रोजचा प्रवासही महाग होणार आहे. ऑटो-टॅक्सीच्या भाडेवाढीचा सामना सर्वसामान्य मुंबईकरांना करावा लागणार आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये 1 सप्टेंबरपासून रिक्षाचे किमान भाडे 1 रुपयाने तर टॅक्सीचे भाडे 2 रुपयांनी वाढणार आहेत.

नव्या दरानुसार, रिक्षाचे किमान भाडे 26 रुपयांवरून 27 रुपये, तर टॅक्सीचे किमान भाडे 31 रुपयांवरून 33 रुपये होणार आहे. साखर, रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ कमी म्हणून की काय, येत्या 3-4 महिन्यांत मोबाईल रिचार्ज दर 12 ते 15 टक्क्यांनी महागणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे सर्वसामान्यांचं दैनंदिन व्यवहाराचं गणित बिघडणार आहे. खरंतर, याआधी आखाती युद्धामुळे झालेल्या इंधन दरवाढीनं संपूर्ण देशात महागाईचा भडका उडाला होता. आता पुन्हा साखर, रिक्षा-टॅक्सी आणि मोबाईल रिचार्जमुळे महागाईचा झटका बसलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार मेहतांची मुजोरी संपेना, 'मिरा-भाईंदर ही जैनांची नगरी'

भारतावर संसर्गजन्य कॅन्सरचं संकट, 23 लाख रुग्णांना व्हायरल कॅन्सर

लाडकी बहीण योजनेवर टांगती तलवार? महिलांचं टेंन्शन वाढलं

सुनिल तटकरेंना कोण करतंय टार्गेट? बड्या नेत्याच्या विधानाने राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

ऐन सणासुदीत टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन महागलं; गॅसचा भडका, टोलच्या दरातही वाढ

SCROLL FOR NEXT