चंद्रपुरात कौटुंबिक वादातून महिला पोलीस शिपायाची आत्महत्या! SaamTvnews
महाराष्ट्र

चंद्रपुरात कौटुंबिक वादातून महिला पोलीस शिपायाची आत्महत्या!

कौटुंबिक वादातून गडचिरोली जिल्हा पोलिस मुख्यालयात कार्यरत महिला पोलिस शिपायाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : कौटुंबिक वादातून गडचिरोली जिल्हा पोलिस मुख्यालयात कार्यरत महिला पोलिस शिपायाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. प्रणाली काटकर (३५) असे मृत शिपाई महिलेचे नाव आहे.

हे देखील पहा :

प्रणाली चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही येथील मूळ रहिवासी असून, मागील सात-आठ वर्षांपासून ती गडचिरोली पोलिस दलात कार्यरत होती. दोन वर्षांपूर्वी संदीप पराते या पोलिस शिपायाशी तिचा विवाह झाला. संदीपचा हा दुसरा विवाह होता. दोघेही पोलिस मुख्यालयानजीकच्या पोलिस कर्मचारी वसाहतीतील एका इमारतीत वास्तव्य करीत होते.

दोघांमध्ये घरगुती कारणावरून वारंवार खटके उडायचे. काल रात्री वाद विकोपाला गेल्याने प्रणालीने विष प्राशन केले. लगेच पती संदीप पराते याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून गडचिरोली पोलीस अधिक तपास करत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT