जन्मदाता ठरला कर्दनकाळ; पोटच्या 5 वर्षांच्या मुलाला फेकलं नदीत! संभाजी थोरात
महाराष्ट्र

जन्मदाता ठरला कर्दनकाळ; पोटच्या 5 वर्षांच्या मुलाला फेकलं नदीत!

पोटच्या मुलाच्या आजारपणाला कंटाळून बापानेच संपवली मुलाची जीवनयात्रा...

संभाजी थोरात, कोल्हापूर

संभाजी थोरात

इचलकरंजी: जन्मदात्या पित्याने आपल्या पोटच्या पाच वर्षाच्या मुलाच्या आजारपणाला होणाऱ्या खर्चाला कंटाळून चक्क पंचगंगा नदीत फेकून दिले आहे. हा धक्कादायक प्रकार कोल्हापूरच्या इचलकरंजीत घडला आहे. बापाचे नाव सिकंदर मुल्ला (रा.कबनुर ) असे आहे. या घटनेबाबतची नोंद गुरुवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसात दाखल झाली.

हे देखील पहा-

पोलीस सध्या या पाच वर्षाच्या मुलाचा शोध घेत आहेत. लहान मुलाचा क्रूरपणे हत्या केल्याची कोल्हापूर जिल्ह्यातील ही चौथी घटना आहे. तर हातकणंगले तालुक्यातील तिसरी घटना असल्याने नागरिक या घटनेने हादरून गेले आहेत.

या धक्कादायक प्रकाराबद्दल घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सिकंदर मुल्ला हे गेल्या काही वर्षापासून कबनूर Kabnur येथे राहतात. त्यांना पाच वर्षाचा मुलगा आहे आणि लहानपणापासूनच त्याला आजाराने वेढल होत. त्यामुळे त्याच्या उपचारासाठी होणाऱ्या सततच्या खर्चाला मुल्ला कुटुंबीय सिकंदर हे त्रस्त झाले होते.

तर, या खर्चाला कंटाळून सिकंदर मुल्ला यांनी दोन महिन्यांपूर्वी घर सोडून पळ काढला होता. पलायन केल्याने त्यांच्या पत्नी आणि मेव्हण्याने त्यांचा शोध घेतला. पुन्हा त्यांना त्या वेळी मुलाला सोडून न जाण्याचा दम त्याच्या पत्नीने दिला.

वारंवार फेर्‍या आणि उपचारासाठी खर्चाला त्रस्त;

त्यांच्या मुलाच्या आजारामुळे मुंबईला Mumbai होणाऱ्या वारंवार फेर्‍या आणि उपचारासाठी खर्च यामुळे कंटाळलेल्या सिकंदर मुल्ला यांनी आपल्या 5 वर्षाच्या मुलाला गुरूवारी रात्री सायकलवरून घेऊन गेले. पंचगंगा नदीत मोठ्या पुलाजवळ येऊन पुलावरून पाच वर्षाच्या मुलाला थेट नदीत फेकून दिलं. त्यानंतर स्वतः घरी आले आणि नातेवाईकांना सांगितलं की, मुलाला फेकून दिलं आहे. मात्र पिताचं असं करेल यावर कोणाचा विश्वास बसला नाही.

परंतु नंतर मुलगा बेपत्ता होता त्यामुळे तो बेपत्ता असल्याची खात्री पटली. त्यामुळे नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर सिकंदर मुल्ला यांच्या सांगण्यानुसार, पोलिसांनी आज पंचगंगा नदीत पाच वर्षाच्या मुलाचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळी जाऊन अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी पाहणी केली आहे. गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात अशा प्रकारची ही चौथी घटना घडली आहे. अशी घटना कानावर पडल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

SCROLL FOR NEXT