dead body saam tv
महाराष्ट्र

शर्मा कुटुंबियांना धक्का; मुलास वाचविण्यासाठी गेलेल्या वडिलांचाही बुडून मृत्यू

या दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनास्थळी तेल्हारा पोलिस दाखल झाले होते.

जयेश गावंडे

अकोला : अकोला (akola) जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील उकळी बाजार येथील कालव्याच्या टेलचे पाणी जात असलेल्या नाल्यात पडून बाप लेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गजानन मोहनलाल शर्मा आणि त्यांचा मुलगा कन्हैया अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. (akola latest marathi news)

तेल्हारा तालुक्यातील उकळी बाजारमधील वांगरगाव शेत शिवारात गजानन शर्मा यांची शेती आहे. शेतामध्ये (farm) काम करीत असताना त्यांचा १२ वर्षीय मुलगा कन्हैया हा कालव्याच्या टेलचे पाणी जात असलेल्या नाल्यात बैल धुण्यासाठी गेला हाेता. त्याठिकाणी त्याचा तोल गेल्यामुळे तो नाल्यात पडला.

मुलाला वाचवण्यासाठी गजानन शर्मा यांनीही त्याच्याकडे धाव घेतली. नाल्यात उडी मारून त्यांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु या घटनेत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोघांचाही मृतदेह शवविच्छेदनासाठी आरोग्य केंद्रात पाठविण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी (police) दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT