Beed Ekurka village Saam Tv
महाराष्ट्र

Beed News : मुलाला वाचवण्यासाठी बापाने विहिरीत उडी घेतली; अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं

ही दुर्देवी घटना बीडच्या केज तालुक्यातील एकुरका गावात घडली.

विनोद जिरे

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली. विहिरीत बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी बापानेही पाण्यात उडी घेतली. मात्र, या घटनेत मुलासह बापाचाही बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना बीडच्या केज तालुक्यातील एकुरका गावात घडली. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सोनू ऊर्फ रोहन नटराज धस (वय 13) आणि नटराज रामहरी धस (वय 33) अशी मृत बाप-लेकांची नावे आहेत. (Beed Todays News)

प्राप्त माहितीनुसार, चौथीच्या वर्गात शिकत असलेला मुलगा सोनू शाळा सुटल्यानंतर वडिलांसोबत शेतात गेला होता. शेतातील राजाभाऊ धस यांच्या विहिरीत पाणी पिण्यासाठी उतरला, मात्र पाय घसरुन तो विहिरीत पडून गटांगळ्या खात असल्याचे त्याच्या वडिलांना दिसले. यावेळी वडील नटराज यांनी विहिरीत उडी घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहन याने त्यांच्या गळ्याला मिठी मारल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

विहिरीजवळ अन्य दुसरे कोणी नसल्यामुळे ते दोघे बापलेक विहिरीत पडल्याची कोणालाही माहिती मिळाली नाही. त्यामुळे ते दोघेही रात्री घरी परत न आल्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. शेतात जाऊन पाहिले असता विहिरीच्या कडेला चप्पल, चॉकलेटचे कागद आणि चिप्सचा पुडा आढळून आला. त्यावरून ते दोघे विहिरीत पडले असल्याचा अंदाज व्यक्त करत गावकऱ्यांनी विहिरीत बोराटी टाकून आणि गळ टाकून शोध घेतला. (Beed Son And Father News)

मात्र शोध लागला नाही. त्यामुळं विहिरीतील पाण्यात कॅमेऱ्याने शोध घेतला असता मृत बापलेक दिसून आले. त्यानंतर पाण्यात गळ सोडून दोघांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. दरम्यान मुलाला वाचताना बापाचाही मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT