Satara Rain Updates Saam Tअस
महाराष्ट्र

Satara Rain: ओढा ओलांडताना बाप-लेकीचा गुदमरुन मृत्यू; साताऱ्यातील दुर्दैवी घटना

राज्यभरात काल दिवसभर अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातलं होतं. साताऱ्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडला यामुळे अनेक ओढ्या नाल्याना पूर आला होता.

ओंकार कदम

सातारा: राज्यभरात काल दिवसभर अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातलं होतं. साताऱ्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडला यामुळे अनेक ओढ्या नाल्याना पूर आला होता. अशातच ओढा ओलांडताना एक गाडी पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याची घटना घडली असून या गाडीमध्ये गुदमरुन बाप लेकीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

साताऱ्यातील (Satara) फलटण तालुक्यातील सोमंथळी येथील ओढा ओलांडत असताना ही गाडी पाण्यातून वाहून गेल्याची घटना घडली आहे. राज्यातील (Rain)अनेक जिल्ह्यांमध्ये काल अपेक्षेपेक्षा जास्तीचा पाऊस पडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल झालेच. तर शहरातील चाकरमाण्याची चांगलीच तारांबळ उडाली होती. तर या अवकाळी पावसामुळे शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

पाहा व्हिडीओ -

काल अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. तर अचानक पडलेल्या या पावसाचा अनेक नागरिकांना अंदाज न आल्यामुळे राज्यभरात अनेक दुर्घटना घडल्या आहेत.

अशातच काल फलटण तालुक्यातील सोमंथळी येथील ओढा ओलांडत असताना एक गाडी ओढ्याच्या पाण्यातून वाहून गेली. या गाडीमध्ये असेली १३ वर्षीय प्रांजल आणि तिचे वडील छगन मदने वय 38 या बाप लेकीचा गुदमरुम दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, नागरिकांनी पावसातून वाहनं चालवताना योग्य ती खबरदारी घ्यावी धोक्याच्या ठिकाणी गाडी घालणं टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

SCROLL FOR NEXT