Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident: चंदनापुरी गावाजवळ भीषण अपघात; मालवाहतूक ट्रक कारवर पलटी, चौघांचा मृत्यू

Accident: अपघात झाल्यामुळे नाशिक-पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक फरार झालाय.

Bharat Jadhav

(सचिन बनसोडे)

Accident On Nashik Pune Highway :

नाशिक -पुणे महामार्गावर एक भीषण अपघात झालाय. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावाजवळ माल वाहतूक ट्रक कार पलटी झाला. यात अकोले तालुक्यातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Latest News)

अपघात झाल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक फरार झालाय. आज राज्यातील दोन-तीन ठिकाणी असे भीषण अपघात झालेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ट्रक आणि कारचा भीषण अपघात

पुण्यातील भोर तालुक्यातील ट्रक आणि कारच्या भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन वर्षांच्या चिमुकल्यासह एकजण जखमी आहे. चीव्हेवाडीजवळील देवडी येथे हा भीषण अपघात झाला. कार किकवीकडून कापूरहोळमार्गे सासवडकडे निघाली होती. तर ट्रक सासवडकडून कापूरहोळकडे निघाला होता.

दोन्ही वाहनांची चीव्हेवाडीजवळील देवडी येथे जोरदार धडक झाली. चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने थेट कारला धडक दिली. धडकेनंतर कार थेट ट्रकच्या खाली घुसली. कारच्या चालकासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर महिलेच्या दोन वर्षाच्या बाळासह अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.

परभणीत भीषण अपघात

परभणीच्या पाथरी तालुक्यातील वडी पाटीवर उसाने भरलेला ट्रक आणि देवदर्शनाहून परतणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघा भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झालेत.

परतूर तालुक्यातील ब्राह्मण वाडीमधील ९ जण परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी येथील मारुती दर्शनाला गेले होते. यावेळी दर्शन करुन घराकडे येताना पाथरी तालुक्यातील वडीपाटीजवळ त्यांच्या जीप कारची आणि उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली.

जुना मुंबई-पुणे महामार्गावर एसटी बसला अपघात

जुना पुणे- मुंबई महामार्गावर खंडाळा घाटातील राजमाची सनसेट पॉईंट येथे एसटी बसचा अपघात झालाय. या अपघातात १२ बस प्रवासी किरकोळ जखमी झाले असून स्वारगेट ते अलिबाग मुरुड असा प्रवास ही बस करणार होती. या बसमध्ये ३५ प्रवासी प्रवास करीत होते. घाटाच्या उतारावर एसटी बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे ड्रायव्हरने प्रसंगावधानामुळे राखत गाडी ही मातीच्या ढिगारावर थांबवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT