nashik, onion, Lasalgaon APMC, Onion price, Farmers Protests saam tv
महाराष्ट्र

Nashik : एकच पक्ष कांद्यावर लक्ष... शेतक-यांनी कांदा लिलाव पाडला बंद, लासलगाव बाजार समितीत बेमुदत आंदाेलन सुरु

यावेळी आंदाेलकांनी सरकार विराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- अजय सोनवणे

Lasalgaon APMC : कांद्याच्या दरात (onion price) रोजच घसरण सुरु आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचा (farmer) खर्च देखील वसूल होत नाही. परिणामी आज नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत (Nashik Lasalgaon APMC Latest News) राज्य कांदा उत्पादक संघटनेने सकाळी सुरू झालेली लिलवा प्रक्रिया बंद पाडली. (Breaking Marathi News)

आज नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत सकाळी लिलाव प्रक्रिया सुरु झाली. तेव्हा कांद्याला कमीत कमी 200 जास्ती जास्त 800 रुपये तसेच सरासरी 400 ते 450 रुपयांचा दर मिळाला. त्यामुळे आजही कांद्याच्या दरात घसरण दिसून आली.

कांद्याच्या दरात रोजच घसरण होत असल्याने राज्य कांदा उत्पादक संघटनेने आजची लिलाव प्रक्रिया बंद पाडली. त्यानंतर परिसरात आंदोलन (aandolan) सुरू केले. कांद्याला 1500 रुपये अनुदान मिळावे. सध्या सुरू असलेल्या लिलावात कांद्याला 15 ते 20 रुपयाने खरेदी करावा अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान यावेळी आंदाेलकांनी सरकार विराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली. आजच्या अर्थसंकल्पात सरकारने कांद्याला चांगल्या दराची जाहीर घोषणा करावी. अन्यथा लिलाव सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा संघटनेचे नेते भरत दिघोळे यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT