nanded news saam tv
महाराष्ट्र

Nanded News : पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा कृषी कार्यालयावर धडक माेर्चा

आश्वासन न पाळल्याने शेतकरी झाले आक्रमक.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News : हदगाव तालुक्यातील सन 2022- 23 या वर्षात जून ते ऑगस्ट या दरम्यान मोठी अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. या अनुषंगाने पीक विमा मिळावा या हेतूने सर्व शेतकरी बांधवांनी 72 तासाच्या आत क्लेम दाखल केला. (Maharashtra News)

या परिस्थितीत असताना देखील युनायटेड इन्शुरन्स कंपनीने विमा देण्यासाठी टाळाटाळ केली होती. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मोठा लढा उभारण्यात आला. यामुळे पिक विमा कंपनीला कुठेतरी जाग आली असल्याने कुठल्याही परिस्थितीत सर्वांनाच पिक विमा देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.

दरम्यान नुकतेच या कंपनीच्या माध्यमातून मोजक्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाल्याने उर्वरित शेतकऱ्यांचे काय? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पीक विमा कंपनीच्या विरोधात आता शेतकरी बांधवातून मोठा रोष व्यक्त होत असून आपापल्या विम्याच्या पावत्या ह्या कृषी कार्यालयामध्ये जमा करण्यासाठी साेमवार सकाळपासूनच हजारोच्या संख्येने शेतकरी कृषी कार्यालयासमोर उभे आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT