banana, Shravan Maas 2023, pandharpur krushi utpanna bazar samiti saam tv
महाराष्ट्र

Shravan Maas 2023: श्रावणात केळीचा दर भडकणार? शेतकरी सुखावला, कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला उच्चांकी भाव

Banana Price : केळीच्या दरात वाढ झाल्याने केळी उत्पादक शेतक-यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

भारत नागणे

pandharpur krushi utpanna bazar samiti news : पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (साेमवार) केळीला प्रति किलो 16 रूपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे. वर्षभरातील केळीला आज मिळालेला हा उच्चांकी भाव असल्याचे बाजार समितीतून कळविण्यात आले. (Maharashtra News)

अधिक आणि श्रावण मासाच्या निमित्ताने केळीला मोठी मागणी वाढली आहे. केळीला मागणी वाढल्याने केळीच्या दरात चांगली वाढ झाली आहे. आज पंढरपूरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे 100 टन केळीची आवक झाली.

चांगल्या प्रतीच्या केळीला प्रती किलो 16 ते 17 रूपये भाव मिळाला आहे. वर्षभरातील हा उच्चांकी भाव मिळाला आहे. कमी प्रतीच्या केळीला सहा ते सात रूपयांचा भाव मिळाला. केळीच्या दरात वाढ झाल्याने केळी उत्पादक शेतक-यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

दरम्यान आगामी काळातील सण, समांरभ तसेच श्रावण महिना पाहता केळीचा किरकाेळ विक्रीचा डझनाचा दर 50 रुपयांपेक्षा अधिक जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या पंढपूरात केळीला प्रति डझन 50 रुपये दर मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder eKYC: फक्त २ मिनिटांत करा एलपीजी गॅस सिलिंडरची ईकेवायसी ; स्टेप बाय स्टेप करा फॉलो; अन्यथा मिळणार नाही सब्सिडी

स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकच्या डॉ. अमोल पाटलांबद्दल धक्कादायक माहिती समोर, ९६ महिलांचे...

Social Media Use: सोशल मीडियावर तासनतास घालवल्याने डिप्रेशनचा धोका वाढतो का? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Maharashtra Live News Update : सिलिंडरचा काळाबाजर रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

SSC Exam : पुण्यातच दहावीचे २ पेपर फुटले, टेलिग्रामवरच्या अॅडमिनवर गुन्हा

SCROLL FOR NEXT