Pandharpur News, Malshiras, bangalore mumbai industrial corridor saam tv
महाराष्ट्र

Bengaluru-Mumbai Industrial Corridor Project : राजामाता कल्पनाराजेंसह उदयनराजेंची भागाचा विकास व्हावा हीच इच्छा, तातडीने निर्णय द्या; आंदाेलकांची मागणी

जमिनीचे संपादन तातडीने करावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

भारत नागणे

Pandharpur News : प्रस्तावित बंगळुरू - मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये (bangalore mumbai industrial corridor) माळशिरस तालुक्यातील गारवाडचा (malshiras garwad) व तसेच देणगी स्वरुपात मिळत असलेल्या साडेचार हजार एकर जमिनीचा समावेश करावा या मागणीसाठी गारवाड व परिसरातील शेतक-यांनी आज माळशिरस तहसील कार्यालया समोर एकदिवसीय आंदोलन केले. (Maharashtra News)

या भागातील शेतकरी नेते सोमनाथ वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी काॅरिडारच्या मागणीसाठी हे आंदोलन पुकारले आहे. वाघामाेडे म्हणाले कॉरिडॉरसाठी दोन लाख कोटींची मंजुरी मिळाली आहे. सध्या म्हसवड व धुळदेव परिसरातील २ हजार ९०० हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान या प्रकल्पासाठी माळशिरस तालुक्यातील गारवाड येथील १ हजार ७९३ हेक्टर जमीन देणगी स्वरुपात मिळणार आहे. त्याबाबतची घाेषणा जमीन मालकांनी केली आहे. मात्र जमिनीचे संपादन झाले नाही. त्यामुळे तातडीने इंडस्ट्रियल काॅरिडारमध्ये गारवाडचा समावेश करावा अन्यथा लोकप्रतिनिधींना‌ या भागात फिरू देणार नाही असा इशारा आंदोलक शेतक-यांनी दिली आहे.

दरम्यान या भागाचा विकास व्हावा अशी खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) आणि राजमाता कल्पनाराजे भाेसले (Rajmata Kalpanaraje Bhosale) यांची देखील इच्छा असल्याचे आंदाेलकांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Horoscope : स्वामींच्या कृपेने ५ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, गुरूवार तुमच्यासाठी कसा असेल?

Beed Crime: मुलीला का मारले? जाब विचारताच ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात घातली वीट

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT