kankavli news, farmer, lightning saam tv
महाराष्ट्र

Kankavali Rain : गुरववाडीत घरावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

काेकणात पडणा-या परतीच्या पावसानं रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचे बहुतांश ठिकाणी पाहण्यास मिळत आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

Kankavli News : गेले दाेन ते तीन दिवसांपासून परतीच्या पावसानं काेकणातील (kokan news) काही भागात धुमाकुळ घातला आहे. या पावसामुळं (rain) नदी, नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. बहुतांश ठिकाणच्या सखल भागात माेठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचत आहे. दरम्यान कणकवली तालुक्यात एका शेतक-याचा (farmer) वीज पडून मृत्यू झाला आहे. (Kankavli Latest Marathi News)

कणकवली तालुक्यात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह ढगफूटी सदृश्य पाऊस झाला. या पावसावेळी साळीस्ते गुरववाडी येथे घरावर वीज कोसळल्याची घटना घडली. या घटनेत पांडुरंग नारायण गुरव (वय ५२) यांचा मृत्यू झाला. (Maharashtra News)

याबराेबरच काहीजण त्या घरात होते. त्यांनाही वीजेचा धक्का बसला. ही घटना सायंकाळी साडे चारच्या सुमारास घडली. परतीचा पाऊस ढगफुटीसदृश्य झाल्याने खारेपाटण, साळीस्ते, तळेरे, कासार्डे परिसरात सर्वत्र पाणी साचल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली.

मुंबई - गोवा महामार्गावरील कासार्डे सर्व्हिस रोडसह देऊलकरवाडील महापुरुष मंदीराला देखील पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. काेकणात पडणा-या परतीच्या पावसानं रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचे बहुतांश ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हॉटेल व्यावसायिक तरुणाच्या हत्येनंतर श्रीरामपूरमधील राजकीय वातावरण तापले

Pune News: होर्मुझमध्ये इराणकडून जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, पुण्याच्या इंजिनिअरचा मृत्यू

Malvan Fort : मालवणमधील ऐतिहासिक रत्न! अरबी समुद्रावर नजर ठेवणारा 'हा' किल्ला आजही दिमाखात आहे उभा

अवघ्या २० मिनिटांत बनवा मऊसूत ओट्स इडली; घरच्या घरी करा 'ही' सोपी रेसिपी

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

SCROLL FOR NEXT