Accident Saam tv
महाराष्ट्र

Beed Accident: अंगावरून पिकअप गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू...

बीडच्या मस्साजोग गावातील दुर्दैवी घटना

विनोद जिरे

बीड - पिकअप पाठीमागे घेतांना, एका 60 वर्षीय शेतकऱ्यास जोराची धडक देत अंगावरून गेल्याने, या अपघातात शेतकऱ्याचा (Farmer) मृत्यू झाला आहे. ही घटना बीडच्या (Beed) मस्साजोग गावात घडली आहे. गंगाधर भानुदास कदम वय 60 रा. मस्साजोग ता. केज असं मृत शेतकऱ्याच नाव आहे.

हे देखील पाहा-

बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या मस्साजोग येथील शेतकरी, गंगाधर भानुदास कदम, हे शेतातून गावात येत होते. ते रस्त्यावर आले असता कोंबड्यानी भरलेल्या पिकअपने, रिव्हर्स घेताना, गंगाधर कदम यांना जोराची धडक दिली, यावेळी ते खाली पडले. मात्र चालकाने याकडं लक्ष न देता अन पाठीमागे न पाहून अंगावरून पिकअप घातले.

या अपघातात गंभीर झालेल्या शेतकरी गंगाधर कदम यांना, तातडीने अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र काही मिनिटात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुलगा अशोक गंगाधर कदम यांच्या फिर्यादीवरून पिकअप चालकाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिकअप चालक फरार झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT