धक्कादायक : शेतकऱ्याचा मंत्रालयासमोरच आत्महत्येचा प्रयत्न Saam tv news
महाराष्ट्र

धक्कादायक : शेतकऱ्याचा मंत्रालयासमोरच आत्महत्येचा प्रयत्न

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर मंत्रालयाच्या समोरच हा प्रकार घडल्याने काही वेळासाठी याठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

जळगाव (Jalgaon) येथील एका शेतकऱ्याने मंत्रालयासमोर (Mantralay) अंगावर रॉकेल टाकत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पार्श्वभुमीवर मंत्रालयाच्या समोरच हा प्रकार घडल्याने काही वेळासाठी याठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आज १५ ऑगस्ट दिनी मंत्रालयसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे व्यक्तीचे नाव सुनील दामू गुजर व राहणार मुक्काम पोस्ट नेरी बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव असे आहे.

जळगाव पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका व्यापाऱ्याविरुद्ध तक्रार दिली होती. पण गुन्हा नोंद न झाल्यामुळे जळगाव पोलीस प्रशासनाच्या नाकर्तेपणास कंटाळून मंत्रालय याठिकाणी आत्मदहन इशारा दिला होता. आज सकाळी ०९.३५ वाजताचे सुमारास राजगुरू चौकातून मंत्रालयाकडे येत असताना पोलिसांनी गुजर यांंना तब्यात घेत असताना त्याने रॉकेल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे काही वेळासाठी या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Edited By - Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT