beed accident news saam tv
महाराष्ट्र

Beed Accident News : रेल्वे इंजिनच्या धडकेत शेतकरी ठार, गौखेलच्या तरुणावर काळाची झडप

या अपघातांची नाेंद पोलीस ठाण्यात झालेली आहे.

विनोद जिरे

Beed News :

रेल्वेच्या सुरू असणाऱ्या कामासाठी इलेक्ट्रिक साहित्य मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे इंजिनच्या धडकेत वृद्ध शेतकरी जागीच ठार झाला. ही घटना बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या चिंचोली गाव परिसरात घडली आहे. लाभा दिगंबर गवळी (वय 72) असं मयत वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. (Maharashtra News)

आष्टी तालुक्यातील चिंचोली परिसरात रेल्वेच्या इलेक्ट्रिकचे काम सुरू आहे. यामुळे रेल्वे इंजिन मशीन हे इलेक्ट्रिक साहित्य घेऊन धावत असते. याच दरम्यान चिंचोलीच्या गवळीवस्तीवर राहणारे लाभा दिगांबर गवळी हे आपल्या शेताकडे निघाले हाेते.

अहमदनगरवरून येत असलेल्या इंजिनची लाभा गवळी यांना धडक बसली. या धडकेत ते जागीच ठार झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला असून या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

गाैखेलच्या तरुणाचा अपघाती मृत्यू

दरम्यान अन्य एका घटनेत कारखान्यात जात असताना तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बीडच्या आष्टीहुन दौंडकडे जात असतांना घडली. योगेश वामन (राहणार. गौखेल, ता. आष्टी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी - आष्टी तालुक्यातील गौखेल येथील राजू वामन हे ऊसतोड मुकादम आहेत. त्यांचा मुलगा योगेश वामन हा दुचाकीवरून कारखान्याकडे जात होता. यादरम्यान अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात योगेशचा जागीच मृत्यू झालाय. दरम्यान या घटनेने आष्टी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे..

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT