Dr.Rajendra Shingane  SaamTvNews
महाराष्ट्र

कुटुंब नियोजन किट प्रकरण; दोषींवर कठोर कारवाई करणार : पालकमंत्री शिंगणे

बुलढाणा येथील कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग आढळून आल्या प्रकरणी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

जयेश गावंडे

अकोला : बुलढाणा येथील कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग आढळून आल्या प्रकरणी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती बुलढाणा (Buldhana) पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांनी दिली.

हे देखील पहा :

मंत्री शिंगणे अकोल्यातील (Akola) कुटासा येथे आयोजित एका कार्यक्रमात आले असता माध्यमांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. शिंगणे म्हणाले या मध्ये कोणी दोषी असेल कोणी जाणून बुजून केले असेल अशांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल. हा राष्ट्रीय कार्यक्रम असून कुणी या कार्यक्रमात बाधा आणण्याचे काम करत असेल तर जबाबदारी ठरवून कारवाई करण्याचा इशारा शिंगणे यांनी दिलाय.

दरम्यान त्यांनी भाजप आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांच्या वक्तव्य वर शिंगणे म्हणाले. नवाब मलिक हे अल्पसंख्याक नेते असून अल्पसंख्याक नेत्यांवर अशा प्रकारे गंभीर आरोप सातत्याने होत असतात. हा एक कटाचा भाग असून नवाब भाईंना मी अनेक वर्षांपासून ओळखतो अतिशय चांगला नेता आणि उन्नती करणारा नेता असल्याचे शिंगणे म्हणाले. त्यांचे अशा प्रकारचे कोणतेही संबंध नाहीत असं देखील शिंगणे म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT