Nashik Crime  Saam Tv
महाराष्ट्र

नाशिकमध्ये सैराटचा थरार! आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून नवदाम्पत्यासह चौघांना मारहाण

मवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.

अभिजित सोनावणे

नाशिक : सुरगाणा पोलीस ठाण्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेल्या तळपाडा शिवारात नवविवाहित दाम्पत्यासह चौघांना सैराटस्टाइल शस्त्राने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत नवदाम्पत्यासह चार जण जखमी झाले. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचं काम सुरू होतं. (Nashik Latest Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, 3 महिन्यांपूर्वी तळपाडा येथील तरुण विजय भास्कर महाले याचे भारती थवील नामक तरुणीसोबत कोर्ट मॅरेज झाले. दोघांच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होता. दरम्यान ही माहिती थवील कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी त्यावेळी त्यांनी विजय याच्यासह त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली होती. त्यावेळी कायद्याप्रमाणे लग्न झाले असे सांगत पोलिसांनी थवील कुटुंबीयांना ताकीद दिली होती.

मात्र मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग थवील कुटुंबीयांच्या मनात होता. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारतीचे काका दिनकर प्रभाकर थवील, वडील रघुनाथ प्रभाकर थवील, भाऊ राहुल रघुनाथ थवील आणि बनपाडा गारमाळ गावातील तब्बल ५० ते ६० लोकांना घेऊन तळपाडा येथे आले. यात विजय, भारती, भास्कर महाले, हिराबाई महाले हे चौघे झोपेत असताना त्यांच्यावर शस्त्रहल्ला केला.

इतकंच नाही तर, त्यांनी भारतीच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. आरडाओरडा झाल्यानंतर मदतीला आलेल्या ग्रामस्थांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली. महाले कुटुंबीयांचा मोबाईल आणि घरातील साहित्य चोरून नेले. या घटनेची माहिती सुरगाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक कोळी यांना तत्काळ देण्यात आली. मात्र, त्यांनाही येण्यास उशीर झाला. रात्री उशिरा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचं काम सुरू होतं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

Weight Loss Tips: वजन झटपट कमी करायचंय? फक्त 'या' 3 सवयी लावा; महिनाभरात कपडे होतील सैल

SCROLL FOR NEXT