मालेगावात बनावट लसीकरणाच्या प्रमाणपत्रांचा सुळसुळाट; धुळे कनेक्शन उघड Saam TV
महाराष्ट्र

मालेगावात बनावट लसीकरणाच्या प्रमाणपत्रांचा सुळसुळाट; धुळे कनेक्शन उघड

मालेगाव महापालिकेच्या तपासणीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक : मालेगावात बनावट लसीकरणाच्या प्रमाणपत्रांचा सुळसुळाट झाला आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे नागरिकांकडे बनावट प्रमाणपत्र असल्याचे उघड झाले आहे. 90 दिवसांनंतरही पहिल्या आणि दुसऱ्या लसीच्या डोसचा बॅच नंबर सारखाचं असल्याचे उघड झाले आहे. मालेगावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मालेगावातील नागरिकांकडे धुळे (Dhule) महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून लस (Vaccine) घेतल्याची प्रमाणपत्र आहेत, परंतु प्रत्यक्षात त्यांनी लस न घेतल्याचे उघड झाले आहे.

मालेगाव महापालिकेच्या तपासणीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळ्याच्या बनावट लस प्रमाणपत्रांचं मालेगाव कनेक्शन उघड झाले आहे. लस न देताच पैसे घेऊन नागरिकांना कोरोना (Corona) प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याच्या प्रमाणपत्रांचं वाटप केले जात आहे. धुळ्यात कोरोना प्रतिबंधक लसीची काळ्या बाजारात विक्री? केली जातीये का अशा तपास महापालिका करत आहे. मालेगाव महापालिका आरोग्य विभागाचं धुळे महापालिकेला चौकशीचं करण्याचं पत्र पाठवण्यात आले आहे. बनावट लसीकरण प्रमाणपात्रांचा मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्राचा संकल्प; ३ वर्षांत १४५ उड्डाण पूल-CM फडणवीस

मुख्यमंत्र्यांची मोठी खेळी;10 आमदार देणार AIADMK पक्षाचा राजीनामा; राजकारणात मोठी खळबळ

Mix Bhaji Recipe : पावसाळ्यात घरच्या घरी बनवा कुरकुरीत मिक्स भजी; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल

Medha Manjrekar: 'देवाने प्रत्येक टप्प्यावर साथ दिली...'; कॅन्सरचे निदान झाल्यानंतर अभिनेत्री मेधा मांजरेकर यांची भावनिक पोस्ट

Maharashtra News Live Update: कारची दुचाकीला धडक, तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

SCROLL FOR NEXT