Authorities take strict action against revenue officials involved in fake disability certificate scam in Bhandara district Saam Tv
महाराष्ट्र

दिव्यांग बोगस प्रमाणपत्र प्रकरण अंगलट; 3 बड्या अधिकऱ्यांचे निलंबन तर तिघांना बडतर्फ

Fake Disability Certificate Scam In Bhandara Maharashtra: भंडारा जिल्ह्यात दिव्यांगांच्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवणाऱ्या प्रकरणात महसूल विभागातील ७ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली.

Omkar Sonawane

शुभम देशमुख, साम टीव्ही

भंडारा: दिव्यांगांचा बोगस प्रमाणपत्र तयार करून त्यावर शासकीय नोकरी लाटणाऱ्या महसूल विभागातील सात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनं भंडारा जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भंडारा जिल्ह्यातील विविध विभागात दिव्यांगांच्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर शासकीय नोकरी बळकाविणाऱ्यांची विशेष समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली.

महसूल विभागातील सात कर्मचारी यात दोषी आढळून आल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये भंडाऱ्याचे नायब तहसीलदार आनंद हट्टेवार, तीन तलाठी, एक मंडळ अधिकारी, दोन सहाय्यक महसूल अधिकारी यांचा समावेश आहे. भंडारा येथील नायब तहसीलदार आनंद हट्टेवार यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावं, असा प्रस्ताव जिल्हा निवड समितीच्या वतीनं शासनाकडे पाठवण्यात आला आहे. प्रशासकीय स्तरावर एवढ्या वरिष्ठ पदाच्या अधिकाऱ्यावर अशा प्रकारची कारवाई झाल्यानं महसूल विभागात चांगलीच चर्चा रंगली आहे.

बडतर्फ करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे

१) वसुंधरा वासनिक - इंगळे – मंडळ अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा (पुनर्वसन शाखा).

२) शारदा सूर्यभान झंझाड – तलाठी (मोहाडी)

३) विनोड भावे – तलाठी (मोहाडी)

निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांची नावे

१) शिवशंकर साखरवाडे – सहाय्यक महसूल अधिकारी.

२) योगराज बाबूराव डांगरे – तलाठी (लाखनी).

३) दिलीप सिंग भरतसिंग ठाकूर – सहाय्यक महसूल अधिकारी (पवनी).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात भयंकर अपघात, चिमुकल्या बहीण-भावाला ट्रेम्पोनं चिरडलं, हसत्या-खेळत्या घरावर दु:खाचा डोंगर

Nanded ZP School: जिल्हा परिषदेची शाळा कोणत्या गावाची? शाळेचा वाद थेट पोलिसांच्या दारात, काय आहे प्रकरण?

1 Gram Gold Mangalsutra: सोन परवडत नाही? पण सोन्याचं मंगळसूत्र पाहिजे? ट्राय करा 1 ग्रॅम सोन्याचे ट्रेंडी मंगळसूत्र

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांनी येवल्याच्या प्रांताधिकारी कार्यालयावर फेकले कांदे

Maharashtra politics : १५ महिन्यात राष्ट्रवादीच्या ३ दिग्गजांचे राजीनामे, २ मंत्र्यांचा समावेश, नेमकी कारणं काय?

SCROLL FOR NEXT