Fadnavis says We are Mavlas saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मी आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्री मावळे आहोत; CM फडणवीसांचं सूचक वक्तव्य

Devendra Fadnavis : मी आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्री मावळे आहोत, असं सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं कौतुक केलं.

Saam Tv

नितीन पाटणकर,साम टीव्ही

पुणे: देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात 'कोल्ड वॉर' सुरू असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केलं आहे. पुणे जिल्ह्यातील शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांचंही कौतुक केलं आहे. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही मावळे आहोत. जिथं कमी पडेल तिथं सगळे मदत करू, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पुणे जिल्ह्यातील आंबेगावमध्ये शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून शिवसृष्टी साकारण्यात येत आहे. त्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी शिंदे आणि अजित पवारांवर कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी शिवसृष्टीसाठीही त्यांनी मोठी घोषणा केली. महाराष्ट्र सरकारच्या वतीने शिवसृष्टीला आम्ही ५० कोटी रुपये देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतात...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंचं यावेळी कौतुक केलं. मी आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्री मावळे आहेत. जिथं कमी पडेल तिथं सगळे मदत करू. एकनाथ शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतात आणि पुण्याचे काम असले की अजित पवार तर कधीच नाही म्हणत नाहीत. म्हणून जिथे-जिथे कमी पडेल; तिथे सरकार आपल्या पाठीशी आहे, असे फडणवीस म्हणाले.

शिवसृष्टीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. आम्ही तिघेही मावळे आहोत. एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे असल्यामुळे शिवसृष्टीच्या कामात कुठेही अडथळा येणार नाही. गरज पडली तर आणखी मदत करू, असे आश्वासनही त्यांनी दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्यातील बारा किल्ले युनेस्कोसाठी नॉमिनेट केले आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे किल्ले जागतिक वारसा म्हणून युनेस्को स्वीकारेल ही खात्री आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसृष्टी आमच्यासाठी प्रेरणास्थान

शिवसृष्टी ही आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. शिवसृष्टी बघून मी निशब्द झालो आहे. मी जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी गेलो. सगळं पाहिलं; पण जी प्रेरणा आणि भावना इथं निर्माण झाली ती अप्रतिम आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक विद्यार्थी इथे आलाच पाहिजे. त्याला योग्य पद्धतीने आपला इतिहास कळेल. खरंतर या विद्यार्थ्यांना अधिकचा खरा इतिहास सांगितला पाहिजे होता; पण दुर्दैवाने तो सांगितला गेला नाही. विद्यार्थी इथं आले तर सगळा खरा इतिहास त्यांना कळेल. ज्याने शिवसृष्टी बघितली नाही, त्याने जीवनातला एक वेगळा आनंद गमावला आहे. आम्ही याला मेगा पर्यटनाचा दर्जा दिला असला तरी हे पर्यटनस्थळ नाही. लोकांनी अभ्यास करण्यासाठी इथ यावं, असंही फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT